Covacin vaccine delivered in Kolhapur 
कोल्हापूर

अखेर कोरोना प्रतिबंधक लस दाखल 

शिवाजी यादव

कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोव्हॅक्‍सिीन लस आज कोल्हापूरात दाखल झाली. येत्या काही तासात लसीकरण सुरू होणार आहे. काही दिवसापूर्वी यशस्वी झाली आहे. त्यानुसारच जिल्ह्यातील शासकीय कोरोना योध्यांना  हे लसीकरण होईल त्यासाठी पुणे आरोग्य विभागाकडून ३७५८० डोस कोल्हापुरात पाठवल्या आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिली. 

कोल्ड पॅकिंग व्हॅनव्दारे या लस येथे आणण्यात आल्या. त्यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक कोल्ड व्हॅनसह पुण्याला गेले होते ते आज लस घेऊन परतले आहे. आणलेल्या लस या वैद्यकीय शितगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यात सीपीआर रूग्णालय, आयसोलेशन हॉस्पीटल, सेवा रूग्णालय , पंचगंगा हॉस्पिटल व पुलाची शिरोली आरोग्य केंद्र आदी 25 ठिकाणी शासकीय सेवेतील हे लसीकरण होणार आहे. त्यासाठी शंभरावर कोरोना योध्यांच्या सहभागाने हा ड्राय रन घेण्यात आला. त्यानुसार लस देण्याची प्रक्रीया होणार आहे. 

रूग्णलयांतील तीन कक्ष आहेत, यात एका कक्षात कोरोना योध्यांचे ओळखपत्र तपासणी होईल दुसऱ्या कक्षात लसीकरण होईल. तिसऱ्या कक्षात संबधीत योध्याला विश्रांती देण्यात येणार आहे. अशा तिन टप्प्यांमध्ये आरोग्य विभागाचे डॉक्‍टर्स व वैद्यकीय कर्मचारी लसीकरण करतील. या लसीकरण कामकाजाची अंतिम नियोजना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे. 
यात किती टप्प्यात मध्ये किती लोकांपर्यंत लस दिली जाणार याची माहिती घेतली जात आहे.

या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात शासकीयस्तरावर काम करणारे कोरोना योद्धे त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जेजे घटक कार्यरत आहेत. अशांना लस प्राधान्याने देण्यात येणार आहे. त्यासाठी 25 हजार व्यक्तींची नाव नोंदणी व सर्वेक्षण झाले आहे. येत्या पंधरा दिवसातच लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पूर्ण क्षमतेने होईल अशी तयारी आरोग्य विभागाने केली आहे.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT