covid 19 curfew upadate kolhapur health marathi news 
कोल्हापूर

Covid 19 Update : बिनधास्त या कोल्हापुरात कोरोनाचे कोण विचारतोय?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापुरात बिनधास्त या, कोण विचारतोय? अशीच स्थिती सध्या आहे. जिल्ह्याच्या सीमानाक्‍यांवर कोरोना संसर्गाची नोंदी-तपासणी होत नाही. इतर राज्यात, जिल्ह्यात लॉकडाउन होत असल्यामुळे अनेक जण कोल्हापुरात येत आहेत. यातून जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. 

औरंगाबाद, नागपूर, सोलापूर येथे शंभर टक्के लॉकडाउन आहे. मुबंई-पुण्याची परिस्थिती यापेक्षा भयंकर होत आहे. तेथील लोक कोल्हापुरात येण्यापूर्वी त्यांच्या नोंदी घेतल्या, तपासणी झाली तरच पुन्हा गावोगावी, शहरात वाढणारा संसर्ग रोखता येईल, अन्यथा पुन्हा एकदा गतवर्षी प्रमाणे गावागावांतून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

नाक्‍यांवर येणाऱ्यांच्या काेरोनाबाबत नोंदीच नाहीत

कोगनोळी टोल-सीमा नाक्‍यावर ही ये-जा करणाऱ्या वाहनांची माहिती नोंद करून घेतली जाते. त्यांना कोणती लक्षणे आहेत की नाही, कोविड चाचणी केली आहे की नाही याची विचारणा केली जाते. यासाठी तेथे आशा वर्कर्स आहेत. दिल्ली, गुजरात, आंध्र प्रदेशात ही जाण्यापूर्वी किमान ७२ तासापूर्वीच कोरोना चाचणी झाली आहे काय याची विचारणा केली जाते. किंबहुना विमानासह अन्य प्रवासात अशा  चाचणीच्या अहवालाची मागणी केली जाते. यातून कोल्हापुरातील लोक ज्या ठिकाणी जाणार आहेत ते त्यांच्या  जिल्ह्याची,राज्याची काळजी घेत आहेत. तर पुणे, मुंबई, बेळगाव, सोलापूर अशा ठिकाणाहून कोल्हापुरात येणाऱ्यांच्या चाचणी किंवा नोंदी आपण काहीच घेत नाही. 

सद्य स्थितीला कोल्हापूर जिल्ह्याच्या कोणत्याही सीमा नाक्‍यांवर तपासणी करण्याचा विचार नाही. नोंदी ही घेण्याचे नियोजन नाही. तूर्तास सध्या सर्वांना ये-जा करण्यास मुभा राहणार आहे. आजच्या घडीला यावर कोणतेही निर्बंध नाहीत.
-दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT