covid 19 impact for dangal gril Due to lack of competitions honorarium and ratios are also closed 
कोल्हापूर

Video : ‘दंगल गर्ल’ चितपटच ! आखाडे बंद, स्पर्धा बंद करायचं काय

मतीन शेख

कोल्हापूर : कुस्ती पुरुषी वर्चस्वाचा क्रीडा प्रकार, या मानसिकतेला छेद देत अलीकडच्या दशकात महाराष्ट्रात अनेक मुलींनी कुस्तीच्या आखाड्यात शड्डू ठोकत तांबड्या मातीसह मॅटवरही अस्तित्व निर्माण केले. मल्लांप्रमाणे कसरत करत, आहार घेत मोठ्या हिमतीने कुस्ती आत्मसात करत मैदाने गाजवली; परंतु कोरोना महामारीच्या काळात महिला कुस्तीपटू चितपट झाल्या आहेत. आखाडे बंद, स्पर्धा बंद असल्याने महिला कुस्तीगीरांनी करायचं काय, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे आहे. त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, अशी मागणी होत आहे.


राज्यात घरोघरी एक तरी पैलवान, अशी परंपरा होती. महिला कुस्तीबाबत मात्र ‘पोरींनी कुठे कुस्ती खेळायची असतेय काय!’ अशी हेटाळणी होत होती; परंतु काळ बदलत गेला अन्‌ अनेक पालकांनी मुलींना आखाड्यात पाठवलं, अनेकांनी तर घरातच आखाडे सुरू केले. नटण्या - थटण्याच्या वयात मुलींनी बॉबकट करून कुस्ती लढत घाम गाळणं स्वीकारलं. या वेळी महाराष्ट्राच्या तमाम कुस्ती शौकिनांनीही त्यांना मोठ्ठ पाठबळ दिलं, त्यांचा पुरुष पैलवानांबरोबरीने आदर सत्कार व कौतुक केले;

परंतु याच ‘दंगल गर्ल’ सध्या अडचणीत सापडल्या आहेत. कोरोनाच्या काळात मुलींची कुस्ती थांबली आहे. स्पर्धा बंद असल्याने खुराकाचा खर्च भागवायचा कसा, सराव कसा करायचा, असा प्रश्न आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड व पुणे येथील आळंदीत महिला कुस्तीची मुख्य निवासी प्रशिक्षण केंद्रे आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यातही आखाड्यात या कुस्तीपट्टू सराव करतात; परंतु कोरोना संसर्गामुळे आखाड्यांना टाळे लागले आहे. राज्यातल्या मुलींनी चाकोरी मोडत शड्डू ठोकत कीर्ती तर मिळवली; परंतु या दंगल गर्लच्या कारकिर्दीत कोरोना अन्‌ लॉकडाउन आडवा आला आहे.

हेही वाचा- धक्कादायक प्रकार समोर ; तरच डाॅक्टर रूग्णांना हात लावतात अन्यथा... -

कुस्ती लीगद्वारे उभारी देण्याची गरज...
बहुराष्ट्रीय कंपन्या, तसेच उद्योजकांनी या मुलींना आर्थिक मदत देऊ केली; परंतु लॉकडाउनचा परिणाम उद्योग जगतावरही झाल्याने मिळणारी स्पॉन्सरशिप थांबली आहे. पंजाब, हरियाना सरकार खेळाडूंना नोकरी, तसेच आर्थिक मदत देत उभारी देते. महाराष्ट्र सरकारनेही याकडे लक्ष द्यावे, महाराष्ट्र कुस्ती लीगसारख्या स्पर्धा आयोजित कराव्यात, अशी मागणी आता पुढे येत आहे.

स्पर्धा सुरू झाल्या नाहीत, तर हात पिवळे...
मुलींचा कोरोना महामारीत हिरमोड झाला आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुली या काळात घराकडे परतल्या आहेत. कुस्तीचा सराव बंद असल्याने त्या अस्वस्थ आहेत. खुराकाला पैसे नाहीत, सरावाला सुविधा नाहीत; मग बसून काय करायचं म्हणून शेतात राबण्याची वेळ अनेक महिला मल्लांवर आली आहे. लवकर कुस्ती स्पर्धा सुरू झाल्या नाहीत, तर मुलींचे हात पिवळे करून देण्याचा विचार काही पालक करत आहेत.

कोरोनामुळे स्पर्धा रद्द झाल्याने मानधन नाही. ग्रामीण भागातील मुलींचा खुराक, तसेच सराव थांबल्याने त्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. शासन आणि कुस्ती शौकिनांनी महिला मल्लांना मदत करावी.
- कोमल गोळे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT