Creation of inserts use by daily using mask research by dkte institute ichalkaranji 
कोल्हापूर

इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांनी केली इनसर्टसची निर्मिती; आता श्‍वसनाच्या आजाराचा धोका होणार दूर

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर)  :  येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल केमिस्ट्रीच्या अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी संशोधन करून औषधी गुणधर्म असलेले इनसर्टस विकसित केलेले आहेत.  

मास्कमध्ये या इनसर्टसचा वापर केला तर इनसर्टमधील मायक्रोकॅपसुल्स नियंत्रित प्रमाणात औषधी गुणधर्म बाहेर सोडतात यामुळे श्‍वसनसंस्थे संबंधीत आजारापासून मुक्तता होते.
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून प्रतिबंधक उपाय म्हणून करणसिंह पाटील, अक्षय कुलकर्णी, हरीष राज के, सददाम सुतार या विद्यार्थ्यांनी प्रा. सौ. एस.व्ही. चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली  हा नाविण्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला .     विद्यार्थ्यांनी मास्कमध्ये वापरता येणा-या औषधी गुणधर्म असलेल्या इनसर्टसची निर्मिती केलेली आहे.


व्हिस्कोस नॉनवोव्हन कापडावर एनकॅप्सुलेशन पध्दतीने निलगिरी तेल व जास्मिन तेल इ. चा वापर करुन हे इनसर्टस बनविले आहे.या गुणकारी इनसर्टसचा वापर हा सर्दी, दमा सारख्या आजारांनी त्रस्त असणा-या रुग्णांसाठी व कोरोना सारख्या विषाणूपासून संरक्षणासाठी देखील करता येवू शकतो. हवेतील वाढते प्रदुषण व विविध विषाणु यामुळे मनुष्याच्या श्‍वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत.  त्यामुळे फेसमास्कचा वापर अनिवार्य बनला आहे.  फेसमास्कच्या वापरामुळे प्रदुषित हवा व धुळीपासून श्‍वसनसंस्थेचे काही प्रमाणात संरक्षण होते अशा मास्कमध्ये या इनसर्टसचा वापर होवू शकतो.


या औषधी इनसर्टस्ची परिणामकारकता तपासण्यासाठी सर्दी असलेल्या आणि सफाई कामगारांच्या मर्यादित ग्रुपना असे इनसर्टस लावलेले फेसमास्क वापरण्यासाठी दिले गेले. त्यांच्याकडून मत जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी या पध्दतीचे इनसर्टस बाजारात उपलब्ध असणा-या वोव्हन, निटेड अथवा नॉनवोव्हन मास्कमध्ये वापरले असता श्‍वसनसंस्थेसंबंधीत आजारांवर याचा चांगला परिणाम झाला असलेचा निष्कर्ष त्यांनी काढला. इनसर्टस बनविणा-या सर्व विद्यार्थ्यांना संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले व उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT