crime case Gokul Shirgaon police demanded seven days police custody from the magistrate 
कोल्हापूर

परराज्यातून येऊन पैसे कमवतोय म्हणून त्याच्यासोबत घडला हा धक्कादायक प्रकार

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी (कोल्हापूर) : तामगाव (ता. करवीर) येथील अमर शेटके यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या जमीऊल अंसरुल हक (वय ३९, पश्‍चिम बंगाल) या ठेकेदाराचे खंडणीसाठी अपहरण करून सोन्याचे दागिने व रोकड असा दोन लाख आठ हजार रुपयांचा ऐवज सहा जणांनी पळवला. दरम्यान, सहापैकी चौघांना अटक केली आहे. यासंदर्भात ४ सप्टेंबरला जमीऊल यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली. 


गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी वेगाने सूत्रे हलवीत चौघांना अटक केली. विशाल जयसिंग मछले (वय २९, आंबेडकरनगर कसबा बावडा), किशोर दडाप्पा माने (वय २९, इंदिरानगर, शिवाजी पार्क, कोल्हापूर), राकेश बाळू कांबळे (वय ३०, महालक्ष्मीनगर, कदमवाडी) व राहुलसिंग तुफानसिंग दुधाने (वय २५, विचारेमाळ) यांना अटक केली. इरफान शेख (पूर्ण नाव समजू शकले नाही) व किरण दडाप्पा माने पसार झाले आहेत. अटक केलेल्या संशयितांना सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे केली आहे.


२८ ऑगस्टला रात्री दहा वाजता फिर्यादी जमीऊल यांचे तामगाव येथून अपहरण केले. परराज्यातून येऊन येथे कामगार ठेकेदार म्हणून भरपूर पैसे कमवत आहेस, त्यामुळे खंडणी देण्याची मागणी करीत तब्बल २६ तास अपहरण केले. चाकूचा धाक दाखवून तामगाव, चंदगड, मयूर पेट्रोल पंप, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी येथे जमीऊलना फिरवत त्यांच्याकडील दागिने, रोकड, चंदगड येथून एटीएमवरून काढलेले ४१ हजार, तसेच मित्र गौतम कांबळे यांच्याकडून घेतलेले ४० हजार  असा ऐवज लंपास केला. जमीऊल यांना २९ ऑगस्टला मध्यरात्री सोडून दिले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

Marathi News Live Updates : गणरायाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरात पोलिसांची कारवाई; डीजेचे साहित्य जप्त

कच्चं तेल १०८ डॉलरवर, सोमवारी ३.३ टक्क्यांची वाढ; कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Ganeshotsav : वैद्यकीय साहित्यापासून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; आरोग्यसेवा व पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT