crime case hatkanangale Debt racket on rental vehicles exposed 
कोल्हापूर

भाडोत्री गाड्यांवर कर्ज काढणारे रॅकेट उघड

अतुल मंडपे

हातकणंगले (कोल्हापूर)  : गोव्यातून भाडोत्री घेतलेल्या मोटारी गहाणवट ठेवून त्यातून लाखो रुपयांची वरकमाई करणारी एक टोळी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत सक्रिय असून, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. यापैकी काही मोटारी शहापूर पोलिसांनी शोधून काढून मूळ मालकांच्या ताब्यात दिल्या आहेत. यातील संशयितांमध्ये कोल्हापूर, रुकडी, हातकणंगले, हेरलेतील काही जणांचा समावेश आहे.


मिळालेली अधिक माहिती अशी  

राजारामपुरी कोल्हापूर व रुकडी (ता. हातकणंगले) येथील दोघांचा गोवा येथे घाऊक कपड्यांचा व्यापार आहे. यानिमित्त त्यांना नेहमीच मोटारीची गरज लागते. यातून मोटारी भाड्याने देणाऱ्या काही जणांशी त्यांची ओळख होती. लॉकडाउनपूर्वी त्यांनी काही गाड्या भाड्याने घेतल्या व ते कोल्हापुरात आले. याच दरम्यान लॉकडाउन सुरू झाल्याने त्यांनी त्याचा गैरफायदा घेत यातील मोटारी कोल्हापूर, सांगली, हातकणंगले परिसरातील काही जणांकडे गहाणवट ठेवून लाखो रुपये उचलले.


दरम्यान, मोटार आणि भाडेकरू दोन्हीही गायब झाल्याने व त्यांचा काहीच संपर्क होत नसल्याने हवालदिल झालेल्या यातील एका मोटार मालकाने गोवा पोलिसांकडे याबाबतची तक्रार केली. दरम्यान, याची कुणकुण शहापूर पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला लागली. त्याने वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. शोधमोहीम राबविल्यानंतर शहापूर पोलिसांना दोन मोटारी (जीए ०८ एम ७३४६, जीए ०३ वाय ९६५०) मिळाल्या. त्यांनी कागदपत्रांची शहानिशा व पूर्तता करून दोन्ही मोटारी मूळ मालकांच्या ताब्यात दिल्या. गाडी गहाणवट घेऊन लाखो रुपये देणाऱ्यांची अवस्था गाडी आणि पैसे दोन्हीही गेल्याने ‘तेलही गेले व तूपही गेले’ अशी झाली आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT