crime case in ichalkaranji one person dead in this case in kolhapur 
कोल्हापूर

इचलकरंजी हादरली ; परिसरात 24 तासात दोन खून झाल्याने खळबळ

पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील शांतीनगर परिसरातील कत्तलखानाच्या मागील बाजूस एका तरुणाच्या डोक्यात जड वस्तू घालून खून करण्यात आला. आज सकाळी पोलिसांना आलेल्या निनावी फोननंतर हा प्रकार उघडकीस आला. निर्जनस्थळी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, इचलकरंजी शहर व परिसरात गेल्या 24 तासात खुनाच्या दोन घटना घडल्याने खळबळ माजली आहे. 

या घटनेतील मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. चेहऱ्याचा संपूर्ण  चेंदामेंदा झाल्याने ओळख पटवताना पोलिसांना अडचणी येत होत्या. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात चप्पल, दारूची बाटली मिळून आली आहे. एका ठिकाणी खुन करून मृतदेह फरफटत नेऊन थोड्या अंतरावर टाकण्यात आला होता. मृताच्या पॅंटला चावी असल्यामुळे परिसरात वाहनाचा शोध पोलिस घेत होते. मृताची ओळख पटल्यानंतरच तपासाला अधिक गती येणार आहे.

दरम्यान काल इचलकरंजी-हातकणंगले मार्गावरील कोरोची माळावर काल अज्ञात मारेकऱ्यांनी एका तरुणाचा दगडाने चेहरा ठेचून निर्घृण खून केला. शुभम उमेश कमलाकर असे मृताचे नाव आहे. शांतीनगर परिसरातील झालेल्या या खुनाचेही नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. काल घडलेली घटना ताजी असतानाच आजच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT