crime case kolhapur Seven injured Crime against 24 persons
crime case kolhapur Seven injured Crime against 24 persons 
कोल्हापूर

प्रेमविवाहातून दोन कुटुंबांमध्ये राडा : ३ महिलांसह ७ जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

मुरगूड (कोल्हापूर)  : प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून कागल तालुक्‍यातील कुरुकली व मळगे खुर्द येथे दोन गटांत काठी व कुऱ्हाडीने झालेल्या हाणामारीत ३ महिलांसह ७ जण जखमी झाले. २४ जणांवर मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कुरुकली (ता. कागल) येथील प्रकाश बाबूराव कांबळे (वय ५२) यांच्या मुलीने काही दिवसांपूर्वी गावातील रवींद्र महादेव कांबळे याच्याशी प्रेमविवाह केला. यावरून गुरुवारी (ता. ८) दुपारी कुरुकलीत दोन कुटुंबात मोठा वाद झाला. दोन्ही कुटुंबे मळगे खुर्दमधील नातलगांसह मुरगूड पोलिस ठाण्यात आली. पोलिसांनी समेट घडवण्याचा प्रयत्न केला;

पण प्रेमविवाह आणि पोलिस ठाण्यास तक्रार दिल्याच्या रागातून पुन्हा रात्री ८ वाजता मळगे खुर्द येथे नातेवाइकांमध्ये काठ्या-कुऱ्हाडीने मारामारी झाली. यात दत्तात्रय बंडू साबळे याने नारायण अशोक कांबळे यांच्या डोकीत कुऱ्हाडीने घाव गातला. सुशील दतात्रय साबळे, बाबूराव पांडुरंग साबळे, विशाल पांडुरंग साबळे व संभाजी शिवाजी माने (सावर्डे बुद्रुक) यांनी बाबूराव लक्ष्मण साबळे यांना काठीने माराहाण केली. तसेच ऋषिकेश चंद्रकांत साबळे व नितीन चंद्रकांत साबळे यांनी आसावरी संजय साबळे व स्नेहा संजय साबळे (सर्व मळगे खुर्द) यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून झोंबाझोंबी करून अश्‍लील वर्तन केले. याशिवाय इतर अनोळखी आरोपींनी काठ्यांनी मारहाण करीत 
शिवीगाळ केली. फिर्यादी प्रकाश बाबूराव कांबळे, शोभा प्रकाश कांबळे (कुरुकली), नारायण अशोक कांबळे, बाबूराव लक्ष्मण साबळे, सौरभ बाबूराव साबळे, आसावरी संजय साबळे, स्नेहा संजय साबळे (मळगे खुर्द) हे सात जण जखमी झाले.


प्रकाश बाबूराव कांबळे (कुरुकली) यांच्या फिर्यादीनुसार दतात्रय बंडू साबळे, चंद्रकांत श्रीपती साबळे, पांडुरंग बच्चाराम साबळे, सुशील दतात्रय साबळे, बाबूराव पांडुरंग साबळे, विशाल पांडुरंग साबळे, ऋषिकेश चंद्रकांत साबळे, नितीन चंद्रकांत साबळे, तानाजी गणपती साबळे, शुभम तानाजी साबळे (सर्वजण मळगे खुर्द), महादेव सदाशिव कांबळे, रवींद्र महादेव कांबळे (कुरुकली), संभाजी शिवाजी माने (सावर्डे बुद्रुक), दतात्रय साबळे (केनवडे ता. कागल) यांचा येथील मेहुणा यांच्यासह इतर ८ ते १० नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर खाडे व पोलिस हेड कॉन्स्टेबल नलवडे करीत आहेत.

संपादन -अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT