crime cases in ichalkaranji competition and attack on youth in kolhapur
crime cases in ichalkaranji competition and attack on youth in kolhapur 
कोल्हापूर

रोहितने दिली जीवे मारण्याची धमकी अन् विशालच्या पाठीत धारदार शस्त्राने केले वार

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर पैशाच्या देवघेवीवरून झालेल्या खुनी हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला. विशाल महादेव कांबळे (वय २३, साठे गल्ली, साईट नं. १०२) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. रोहित बाळू तडाखे (जाधव मळा), बच्चन लक्ष्मण कांबळे, शाहू दिलीप कांबळे (साईट नं. १०२) या तिघाविरोधात गावभाग पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

शहरातील साईट नं. १०२ मध्ये क्रिकेट मॅच झाली. मॅच जिंकल्यानंतर लावलेल्या पैजेवरून वाद निर्माण झाला होता. त्यातूनच शुक्रवारी रात्री उशिरा रोहित तडाखे, बच्चन कांबळे, शाहुल कांबळे जखमी विशाल कांबळे याच्या घरी गेले. मात्र विशाल घरी नव्हता. त्याच्या नातेवाइकांसमोर विशालला जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी साईट नं. १०२ रस्त्यावरील कमानीजवळ विशाल मोटारसायकलवरून येताना निदर्शनास आला. तिघांनी विशालला रस्त्यातच आडवून मारहाण करण्यास सुरवात केली.

बच्चन याने त्याला लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. रोहितने जीवे मारण्याची धमकी देत विशालच्या पाठीत चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केला. पाठीत चार वार झाल्याने विशाल रस्त्यावर कोसळला. त्यानंतर संशयीतांनी पळ काढला. नातेवाइकांनी जखमी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तपास करून संशयीत रोहित तडाखे, बच्चन कांबळे, शाहुल कांबळे यांना अटक केली. याबाबतची फिर्याद जखमी विशाल कांबळे याने गावभाग पोलिसात दिली.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT