The crime of demanding ransom on a youth 
कोल्हापूर

तरुणावर खंडणी मागितल्याचा गुन्हा

अजित माद्याळे

गडहिंग्लज : इन्स्टाग्रामवर एका अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याकडून 1 लाख 33 हजार रुपये खंडणी उकळल्याची तक्रार संबंधित मुलीच्या आईने पोलिसांत आज दिली. यावरून कोल्हापूरच्या यादवनगरमधील एकाविरुद्ध येथील पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. गेल्या चार महिन्यापासून 8 मार्चअखेर दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी सांगितले, येथील संबंधित तेरा वर्षीय मुलगी सहावीत शिकते. इन्स्टाग्रामवर तिची कोल्हापुरातील एकाशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर दोघांचाही मोबाईलवरील संभाषणात झाले. संबंधित संशयित हा मुलीच्या मोबाईलवर सातत्याने अश्‍लिल बोलणे व मेसेज करीत होता. पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला बदनामीची धमकीही देऊ लागला. अशी वारंवार भीती घालून संशयिताने आतापर्यंत मुलीकडून गडहिंग्लज शहरात विविध ठिकाणी 1 लाख 33 हजार रुपये खंडणी उकळली आहे. याप्रकरणी नातवाइकांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Municipal Election : मुंबईसाठी ‘राष्ट्रवादी’ची यादी जाहीर; भाजपला धक्का, मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी

Video: 'त्या' एका व्हिडिओमुळे जान्हवी किल्लेकर ट्रोल, संतापून उत्तर देत म्हणाली...'पुर्णपणे माहिती नसताना...'

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

farmer Success Story: माळरानावर फुलवली बोरांची बाग; कष्टातून मिळतय अडीच लाखांचे उत्पादन ; बोधेगावातील तरुणाचा यशस्वी प्रयोग!

SCROLL FOR NEXT