crime in kolhapur two wheeler driver disputes with people by mistake 
कोल्हापूर

चोर सोडून संन्यासाला फाशी ; दुचाकीस्वारालाच बेदम मारहाण, हा काय प्रकार

राजेश मोरे

कोल्हापूर : मिनी बसची मोटारसायकलला किरकोळ धडक बसली. तशी अज्ञाताने बसच्या काचा फोडल्या. पण हे कृत्य मोटारसायकलस्वारानेच केले या गैरसमजातून त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौक परिसरात दुपारी तणाव निर्माण झाला होता. 

याबाबत घटनास्थळावरू मिळालेली माहिती, मिनीबस चालक आज दुपारी यादवनगर परिसरात प्रवाशांना सोडून सावित्रीबाई हॉस्पीटल चौकातून पुढे जात होती. दरम्यान पुढील एका मोटारसायकलस्वाराला बसची किरकोळ धडक बसली. त्यात मोटारसायकलची नंबर प्लेट तुटली. दरम्यान एका अज्ञाताने बसची दगडाने तोडफोड केली. तसे परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांना हे कृत्य मोटारसायकलस्वाराने केल्याचा गैरसमज झाला. यातून त्यांनी त्याला मारहाण केली. तसा तणाव निर्माण झाला. त्यामुळे रहदारीने गजबलेल्या या चौकात वाहतुकीची कोंडी झाली. दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी गूडन्यूज! मुसळधार पावसाने ७ धरणांच्या पाणीसाठा २९ टक्क्यांवर, २४ तासात १२ टक्क्यांची वाढ

Pandharpur Flood: महापूर आला तरी वारी चुकवणार नाही, पंढरपुरात हजारो भाविक अडकले; तरी प्रस्थान सोहळ्यास जाण्याचा निर्धार

Latest Marathi News Update: देहूत न येता, पिंपरी चिंचवड किंवा पुण्यातून पालखीत सहभागी व्हा; देवस्थानचं आवाहन

Girna Dam Water Level : नाशिकमधील दमदार पावसाचा 'गिरणा'ला मोठा दिलासा; धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, जळगावला मात्र दमदार पावसाची प्रतीक्षाच, पाहा सद्यस्थिती

Gold Rate Today: धाडधाड कोसळला सोन्याचा भाव! सलग चौथ्या दिवशी स्वस्त; आज किती रुपयांना मिळतंय सोनं?

SCROLL FOR NEXT