Ichalkaranji Crime News esakal
कोल्हापूर

इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड

Crime News : या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी धाडस दाखवून दोघांना पकडले.

सकाळ डिजिटल टीम

जर्मनी गँगमधील पाचजण अचानक दहशत माजवत, हातात दारूच्या बाटल्या नाचवत चौकात आले. दारू पिऊन नागरिकांना अडवून वाहनांची तोडफोड सुरू केली.

इचलकरंजी : जर्मनी गँगचे (Germany Gang) कारनामे थांबले नसून, सरस्वती हायस्कूलजवळील भोने माळ परिसरात बुधवारी रात्री नशेत जर्मनी गँगमधील पाच जणांनी हातात दारूच्या बाटल्या आणि यंत्रमागाचे मारे घेत रस्त्यावर दहशत माजवली. ‘आज आमच्या नादाला कोण लागले, तर आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत त्यांनी रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडवून लूटमार केली. तसेच त्यांनी दिसेल त्या वाहनांचीही तोडफोड केल्याने भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी धाडस दाखवून दोघांना पकडले. त्यांची चांगलीच धुलाई करून पोलिसांच्या (Ichalkaranji Police) ताब्यात दिले. मोठमोठ्याने आरडाओरडा करून मारहाणीसह दहशत करून दरोडा घातल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. यापैकी रोहित प्रकाश मांडे (वय २१, रा. भोने माळ), आशादुल्ला हारुण जमादार (वय २६, भोने माळ), अक्षय श्रीकांत बेळगावे (वय २६), अक्षय अशोक घाडगे (वय २२, दोघे रा. लिगाडे मळा) या चार जणांना अटक केली.

न्यायालयाने त्यांना २१ पोलिस कोठडी सुनावली आहे; तर पसार झालेल्या विवेक ऊर्फ श्री विश्वास लोखंडे (रा. स्वामी मळा) याला आज रात्री उशिरा अटक केली आहे. त्यांनी केलेल्या तोडफोडीसह मारहाणीत रवींद्र रामचंद्र भांडे (रा. यशवंत कॉलनी), उत्तम प्रकाश वडे (रा. सरस्वती हायस्कूलजवळ), युवराज गजानन सातपुते (रा. भोने माळ), श्रीमती विद्या सुतार यांसह पाचजण जखमी झाले आहेत; तर एकूण चार वाहनांची तोडफोड केली. याबाबतची फिर्याद महादेव बबन साळी (वय ४६) यांनी पोलिसांत दिली. अटकेतील चार जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर शहापूर, शिवाजीनगर, गावभाग पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Ichalkaranji Crime News

फिर्यादी महादेव साळी प्रेसमधील स्टेशनरीची डिलिव्हरी देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. सरस्वती हायस्कूलजवळ आल्यानंतर आशादुल्ला जमादार, रोहित मांडे, श्री लोखंडे, अक्षय घोडगे आणि अक्षय बेळगावे या पाचजणांनी साळी यांना रस्त्यात अडवले. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि खिशातील २, ७०० रुपये काढून घेतले. त्यानंतर दहशत करत जिव्हेश्‍वर मंदिर मार्गावरून निघाले. यावेळी आमच्या नादाला कोण लागले तर त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत यंत्रमागाच्या माऱ्याने दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड केली. विचारणा करण्यासाठी आलेल्या रवींद्र भांडे, उत्तमप्रकाश वडे, युवराज सातपुते, विद्या सुतार यांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्न करत ढकलून दिले.

या घटनेनंतर भागातील नागरिक संतप्त झाले. यावेळी जमावाने दहशत करणाऱ्यांचा पाठलाग करून मांडे व जमादार या दोघांना चोप देत धुतले, तर अन्य तिघांचा मोठ्या संख्येने नागरिक शोध घेत होते. पोलिस उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांच्यासह शिवाजीनगर व गावभाग पोलिसांचा फौजफाटा भोनेमाळ भागात दाखल झाला. रात्री उशिरा साळी यांच्या फिर्यादीनुसार सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून दरोडा टाकल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील अक्षय बेळगावे वगळता अन्य चौघांवर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

नागरिक भयभीत; जमाव संतप्त

घटनेमुळे संतप्त नागरिकांचा जमाव शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे निघाला होता. पोलिस उपअधीक्षक साळवे यांनी नागरिकांची समजूत काढली. जर्मनी टोळीच्या विरोधात तब्बल सात वेळा मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तरीही या टोळीची दहशत असून, कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली.

भर चौकात ठाण मांडून मद्यप्राशन

जर्मनी गँगमधील पाचजण अचानक दहशत माजवत, हातात दारूच्या बाटल्या नाचवत चौकात आले. दारू पिऊन नागरिकांना अडवून वाहनांची तोडफोड सुरू केली. त्यानंतर पुन्हा पाच जणांनी आरडाओरडा करत रस्त्यावर ठाण मांडले आणि दारू पित बसले. दहशतीची हद्द पार करत पाच जणांनी भागातील नागरिकांवर धाक ठेवल्याचा हा प्रकार घडला. त्यानंतर काही नागरिक पुढे आले आणि त्यांना अद्दल घडवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT