crime news crime news
कोल्हापूर

'तुला आता ठेवत नाही, ठारच मारतो'; बायकोच्या डोक्यात घातले डंबेल्स

कोडोलीत घटना; दारूला पैसे न दिल्याच्या रागातून कृत्य

सकाळ डिजिटल टीम

कोडोली : दारूला पैसे न दिल्याने पत्नी सविता दीपक मोरे (वय ३९, रा. शेटे मळा कोडोली) यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी पती दीपक रंगराव मोरे याच्या विरोधात कोडोली पोलिसांत गुन्हा नोंद झाला. (kodoli police) दीपक याचा मेहुणा सुधाकर शिवाजी चव्हाण (मु. पो. निमणी, नेहरूनगर, ता. तासगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. (crime news)

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दीपक यास दारूचे व्यसन असून तो कामधंदा करीत नाही. पैशासाठी तो घरात वारंवार पत्नी व सासूशी भांडत होता. (kolhapur crime case) गुरुवारी मध्यरात्री पत्नी घरात दुसऱ्या मजल्यावर खोलीत झोपली असताना दीपकने दारूच्या नशेत पत्नी सविता हिला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करून तुला आता ठेवत नाही, तुला आता ठार मारतो असे म्हणून लोखंडी डंबेल्सने तोंडावर डोक्यात मारहाण केली. जखमी अवस्थेत तिला कोडोली उपजिल्हा रुग्णालयात हलवले असता कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात हलविले. पती दीपक यास कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Womens T20 WorldCup: २४ चेंडूत वादळ, दक्षिण आफ्रिकेचा केला धुव्वा! महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आश्वासक नायक; 'दादा, एक गुड न्यूज आहे' फेम ऋषी मनोहरचा नवा धमाका! १९ जूनला काय होणार खास?

दोर बांधायला विसरले, बंजी जंपिंगवेळी निष्काळजीपणा; २१ वर्षीय तरुणीला तशीच फेकली, जागीच मृत्यू

Mumbai News: मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त, 'कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली' बसवणार

Latest Live Updates Marathi: लातूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT