Criminal offense on corona patients in belgaum 
कोल्हापूर

कोरोनाच्या विळख्यातून सुटणार, पण पोलिसांच्या कचाट्यात अडकणार 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोनाबाधितांनी गुरुवारी (ता.11) जिल्हा रुग्णालयात घातलेल्या धुडगुसाबद्दल संबधिताविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय बीम्सने घेतला आहे. त्यामुळे संबधीत रुग्ण बरे होउन बाहेर पडल्यानंतर त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कोरोनाबाधिताकडून डॉक्‍टर आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांना वारंवार लक्ष केले जात असल्याने बीम्स प्रशाससाने ही बाब आता गांभीर्याने घेतली आहे. 

जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. एखाद्या व्यक्‍तिचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्यांना वैद्यकिय कर्मचारी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात दाखल करीत आहेत. त्याठिकाणी उपचार करुन पुन्हा स्वॅब घेतले जात आहेत. दरम्यानच्या काळात रुग्णांकडून डॉक्‍टर आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. सौचालयातील अस्वच्छता, दर्जाहिन जेवण, उपचार, कोरोना तपासणीचा अहवाल येण्यास विलंब होत आहे, आदी कारणे सांगत काल रुग्णांना वार्डाच्या प्रवेशव्दारावर येउन तासनंतास वाद घातला. तसेच यावेळी झालेल्या वादावादीचे व्हिडिओ चित्रीकरण करुन ते सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आले आहे. यापूर्वी देखील रुग्णांनी वार्डात डांन्स केला होता. बाहेरील जेवणास बंदी असल्याने रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या जेवणावर आक्षेप घेण्यात येत आहे. असे यापूर्वी बीम्सने स्पष्ट केले आहे. डॉक्‍टर्स आणि कर्मचाऱ्यांना असहकार्य दर्शविण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. काल तर रुग्णांना अक्षरश: कळस केला. या प्रकारमुळे बीम्स प्रशासन आता संतापले आहे. यापुढे असा प्रकार घडू नये, यासाठी संबधीताविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डिश्‍चार्ज घेउन बाहेर पडल्यानंतर त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. 

कोरोनावार्डात उपचार घेणारे रुग्ण विनाकारण वारंवार दंगा करत डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. काल घडलेल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे संबधीत रुग्णांविरोधात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. 

-जी. एल. दिंडगी, वैद्यकिय अधीक्षक बीम्स


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT