criticized by sharad pawar on narayan rane on the topic of protection of political leaders in kolhapur 
कोल्हापूर

'आता तरी नारायण राणेंना सुखाने झोप लागेल'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी राज्य सरकारला हिणवले होते. राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, त्यामुळे आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल, असा चिमटा शरद पवार यांनी घेतला. कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यघटनेने राज्यसरकारांना कायदा आणि सुव्यवस्थेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बहाल केला आहे. पण राज्यातल्या काही नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत नेत्यांना सुरक्षा दिली. त्याबद्दल आमची तक्रार नाही. पण हा अधिकार राज्यसरकारचा आहे. त्यात  केंद्राने हस्तक्षेप करणे बरोबर नाही. सुरक्षा देण्याची आवश्‍यकता कोणाला आहे? याचा अहवाल पोलिस राज्यसरकारला देत असतात. संभाव्य धोका ओळखूनच ही सुरक्षा दिली जाते. यामध्ये केंद्र सरकारने केलेला हस्तक्षेप चुकीचा आहे, असेही ते म्हणाले. 

राजकीय नेत्यांना पुरवली जाणारी सुरक्षा हा नेहमीच वादाचा विषय बनतो. आताही राज्य शासनाने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, राज ठाकरे आदी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली आहे. यावरून वादाला तोंड फुटले आहे. मात्र राज्य शासनाचा निर्णय डावलून तेथे केंद्र शासनाने हस्तक्षेप करणे ही पद्धत योग्य नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. माझीही सुरक्षा व्यवस्था कमी केली होती, पण त्यावर मी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती, असेही त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री आज आगीच्या घटनास्थळाची पाहणी करणार

कोरोनावर लस निर्माण करणाऱ्या पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये आग लागली होती. या दुर्घटनेत  5 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सीरम संस्थेत लागलेल्या आगीवरून संशयाचा धूर निर्माण झाला आहे. यात घातपाताची कोणतीही शक्यता नाही, असं ठाम मत पवार यांनी व्यक्त केले.सीरम इन्स्ट्यिूट ही जगमान्य आहे. त्यांनी तयार केलेल्या लसीसंदर्भात तज्ञांनीच मते व्यक्त केली आहेत. त्यावर आपण म्हणणे मांडणे योग्य होणार नाही. कारण आपण तज्ञ नाही. पण या इनस्टिट्यूटच्या विश्‍वासार्हतेवर किंचतही शंका घेता येणार नाही.  

येथे आग लागल्याचा प्रकारही चिंताजनक आहे. पण जिथे लसीचे उत्पादन होते. त्या जागेपासून आग लागलेली अंतर खूप लांब आहे. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला पुणे येथे प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

Latest Marathi News Live Update : श्वान चिकित्सकांच्या अधिवेशनाला मोहन भागवत उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार

Hug Day in Valentine Week : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...; नात्यांना सावरण्यासाठी कधीकधी स्पर्शाची उब हवी असते!

SCROLL FOR NEXT