crowd of devotees on jyotiba Mountain
crowd of devotees on jyotiba Mountain 
कोल्हापूर

दख्खनच्या राजाचा डोंगर दुमदुमला ; दुसरा खेटाही हाऊसफूल

निवास मोटे

जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलं, यमाई देवी, चोपडाई देवी, नंदी, महादेव, बद्रिकेदार , काळभैरवाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील दुसरा खेटा आज  हाऊसफूल झाला.
 आज दुसऱ्या खेट्यासाठी महाराष्ट्र,कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे दीड लाख भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले.
 या उच्चांकी गर्दीमुळे आज जोतिबा डोंगरास मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषाणे संपूर्ण ज्योतिबाचा डोंगर दणाणून गेला. आज पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविक डोंगरावर येण्यास सुरुवात झाली. बोचऱ्या थंडीत, रांगेतून भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. सकाळी अकरा अकरा पर्यंत डोंगरावर मोठी गर्दी होती. दुपारनंतर थोडी कमी झाली. सायंकाळनंतर मात्र  भाविकांच्या झुंडी डोंगरावर येत राहिल्या. पहिल्या खेट्यास  लाखापेक्षा अधिक भाविक आल्याने इतर  खेट्यास उच्चांकी गर्दी होईल असे ग्रामस्थांनी सांगितले.
 आज कोल्हापुरातील असंख्य भाविक पंचगंगा नदी काठापासून पायी चालत डोंगरावर आले तर काही भाविक कुशिरे (ता. पन्हाळा ) या गावी दुचाकी चारचाकी, वाहने लावून गायमुख तलाव मार्गे डोंगराव आले तर काही भाविक पोहाळे तर्फ आळते, गिरोली, दाणेवाडी या डोंगरातील पायवाटेने आले, यावेळी जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजराने हा परिसर दणाणून गेला. सकाळी जोतिबासह सर्व देवतांना अभिषेक व इतर धार्मिक विधी झाले, अभिषेका वेळी केदार उपाध्ये, शरद बुरांडे, बंडा उमराणी, सुरज उपाध्ये , प्रकाश उपाध्ये यांनी श्री केदार कवच स्तोत्र, केदार हिमा या विधींचे पठण केले.

सकाळी नऊ नंतर श्री ची सालंकृत महापूजा बांधण्यात आली. दुपारी  धुपारती सोहळा झाला. आज खेट्यांच्या पार्श्वभूमीवर डोंगरावर सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. शनिवार रात्रीच डोंगरावर पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. डोंगरावर पहाटे दरवाजे उघडताना काही भाविकांनी दंगा केल्यानंतर शाहुवाडी विभागाचे पोलिस अधीक्षक अनिल कदम यांनीही डोंगरावर कालपासून काळजीपूर्वक पहाणी करून यंत्रणा सज्ज ठेवली होती. आज सकाळी संपूर्ण गावातून श्वानपथक  फिरवले. रात्री  भव्यदिव्य असा पालखी सोहळा झाला. यावेळी लाखो भाविकांनी पालखीवर गुलाल खोबरे यांची पुष्पवृष्टी केली. पालखी सोहळ्यास देवस्थानचे अधीक्षक महादेव दिंडे,  सर्व देव सेवक, पुजारी, ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते 


भाविकांचे उध्दट वर्तण
जोतिबा डोंगरावर खेट्यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात उध्दट वर्तण  व दंगा करतात. त्यांना रोखण्यासाठी कालपासूनच शाहूवाडी विभागाचे पोलिस अधीक्षक अनिल कदम, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरज बनसोडे, हवलदार एम. एल. पाटील यांनी सर्व यंत्रणा लावून हुलडबाजीस चांगलाच आळा घातला. सकाळ पासून सर्व भाविकांना श्रींचे दर्शन सुरळीत झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत होते


चैत्राची तयारी आतापासूनच
यंदा जोतिबाची चैत्र यात्रा सात एप्रिल रोजी होत असून ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणेने आतापासूनच बैठका घेण्यात सुरुवात केली आहे. सासनकाठी चालक, सेवाभावी संस्था, अन्नछत्र चालक,  ग्रामस्थ, पुजारी, व्यापारी , यांच्या ही बैठका मार्चच्या पहिल्या आठवडयात होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT