कोल्हापूर

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कासारवाडीतील घटना

शेतात पाणी पाजत असताना सायंकाळी साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली

अभिजीत कुलकर्णी

नागाव : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथे वीज पडून शेतमजूर ठार (farmer dead) झाला. भरत संभाजी वाणी (वय ३५, मुळ गाव निर्मळवाडी, ता. वडवणी, जि. बीड, सध्या राहणार कासारवाडी) असे त्याचे नाव आहे. कासारवाडी (kasarwadi) येथील मंडलिक मळ्यात शेतात पाणी पाजत असताना सायंकाळी साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली.

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, कासारवाडी येथील शरद मंडलिक यांच्या शेतामध्ये (farming) भरत वाणी हे मजूरीचे काम करतात. उसाच्या शेतीला पाणी पाजत ते मुलासह लिंबाच्या झाडाखाली उभे होते. पाचच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह पावसाला (heavy rain) सुरुवात झाली. अचानक वीज शेताच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावरती पडली. यामध्ये भरत वाणी व त्यांची मुले करण आणि अर्जुन हे झाडाखाली उभे असल्याने यांच्या अंगावरती वीज कोसळली. यामध्ये भरत वाणी याचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा करण किरकोळ जखमी झाला. भरत हा पत्नी व दोन मुलांसह (child) गेल्या पाच वर्षांपासून कासारवाडीतील मंडलिक मळ्यात मजुर म्हणून काम करत होते. उसाच्या शेताला पाणी पाजत असल्याने पत्नीला दूध घालण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे दोन्ही मुलांना जवळ घेऊन भरत शेतामध्ये पाणी पाजत होता. अचानक वीज कोसळल्याने त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला घटनास्थळी त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT