Death fast if the amount of overdue FRP is not paid 
कोल्हापूर

'थकित एफआरपीची रक्कम नाही दिल्यास आमरण उपोषण'

सकाळ वृत्तसेवा

वारणानगर - गेल्या वर्षीचा गळीत हंगाम संपून चालू वर्षीचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्याची वेळ आली आहे. तरीसुध्दा वारणा साखर कारखान्याने थकीत  एफआरपीची रक्कम अद्याप दिलेली नाही. ही रक्कम तात्काळ दयावी. अन्यथा १५ आक्टोंबरला  शेतकरी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा  स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी वारणा कारखान्यास  निवेदनाद्वारे दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारणा कारखान्याचे सचिव बी.बी. दोशिंगे यांच्याकडे निवेदन दिले. महाराष्ट्र शुगर केन अॅक्टनुसार शेतकऱ्यांचा उस साखर कारखान्याला गेल्यापासून १४ दिवसाच्या आत शेतकऱ्यांचे एफआरपी नुसार पैसे देणे बंधनकारक आहे. गळीत हंगाम संपून सहा महिने झाले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार सर्व रक्कम दिलेली नाही. सध्या कोवीड या महामारीमुळे सर्वच त्रस्त आहेत. शेतकरी कष्टकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. याचा विचार करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम देण्यात यावी अशी मागणी वैभव कांबळे यांनी केली. 

या शिष्ठमंडळात संपतराव पोवार ( पारगाव), सुधीर मगदूम, दिपक सनदे (घुणकी), मानसिंग मोहीते, सदाशिव बोने - पाटील, दिपक सनदे, शिवाजी आंबेकर, अक्षय कांबळे(पारगाव) आदी उपस्थित होते.


 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा टेस्टी पनीर कचोरी, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2025

Satara News: 'धरणग्रस्त आजीला सात वर्षांनंतर न्याय'; ‘मराठवाडी’तील प्रश्न प्रशासनाने सोडविला, देय रक्कम देण्याबाबत कार्यवाही

अग्रलेख : संतुलित निवाडा

SCROLL FOR NEXT