Ichalkaranji Heart Attack Case esakal
कोल्हापूर

डोळ्यांदेखत मुलाच्या मृत्यूने आईनेही सोडला प्राण; हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने नागरिकांच्या अश्रूंचा फुटला बांध

डोळ्यांदेखत लेकराचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने आईनेही प्राण सोडला.

सकाळ डिजिटल टीम

आई व मुलाच्या मृत्यूची वार्ता समजताच नातेवाइकांसह नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. शवविच्छेदनानंतर शोभा आणि प्रीतम यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

इचलकरंजी : डोळ्यांदेखत लेकराचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने आईनेही प्राण सोडला. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने भागातील नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला. येथील पुजारी मळ्यातील प्रीतम दादासो तेरदाळे (वय ३०) याचा हृदयविकाराने मृत्यू (Heart Attack) झाला.

मुलाने डोळ्यांदेखत प्राण सोडल्याने धक्का बसून आई शोभा दादासो तेरदाळे (वय ५४) यांचाही अवघ्या काही क्षणात मृत्यू झाला. दोघांच्याही मृत्यूच्या धक्क्याने वडील आणि मामाला रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी (ता. २३) रात्री अकराच्या सुमारास प्रीतम तेरदाळे जेवण आटोपून शतपावली करून घराबाहेर बसला होता.

मोबाईल घेऊन गप्पा मारत असताना प्रीतमला अचानक चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळला. हे पाहताच आई शोभा यांनाही चक्कर आली. तेरदाळे कुटुंबाचा (Terdale Family) आरडाओरडा ऐकून भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रीतम व शोभा यांना रुग्णालयात हलवले. मात्र, मायलेकरांचा रुग्णालयाच्या वाटेवरच मृत्यू झाला. पत्नी व मुलाच्या मृत्यूचा दादासो तेरदाळे यांनी धसका घेतला, तर बहीण आणि भाचाच्या मृत्यूने मामा अत्यवस्थ झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, आई व मुलाच्या मृत्यूची वार्ता समजताच नातेवाइकांसह नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. शवविच्छेदनानंतर शोभा आणि प्रीतम यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. प्रीतम तेरदाळे इंजिनिअर असून तो लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामास होता. प्रीतमच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

एकाचवेळी अंत्यसंस्कार

मायलेकरांच्या मृत्यूने नातेवाईक आणि पुजारी मळ्यावर शोककळा पसरली. मायलेकरांच्या अंत्यविधीसाठी नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते. एकाच शववाहिकेतून आणत स्मशानभूमीत दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT