Dedication of 125 beds at Rotary-Kridai Kovid Center at Sainik Darbar 
कोल्हापूर

सैनिक दरबारमधील रोटरी- क्रिडाईच्या कोविड सेंटरमंधील १२५ बेडचे लोकार्पण

निवास चौगले

कोल्हापूर,  ः रोटरी आणि क्रिडाई या दोन्ही संस्थांनी नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. त्यांनी आता ग्रामीण भागात कोरोना केंद्राच्या माध्यमातून सुविधा निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. 
रोटरी मुव्हमेंट, क्रिडाईने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉलमध्ये उभे केलेल्या कोविड-19 केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत 
जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, क्रीडाईचे राज्याचे अध्यक्ष राजीव परीख, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, रोटरीचे डिस्ट्रीक्‍ट गव्हर्नर संग्राम पाटील, सचिव ऋषिकेश केसकर, रोटरी मुव्हमेंटचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर आदी उपस्थित होते. 
पालकमंत्री पाटील म्हणाले,"क्रिडाई आणि रोटरी या दोन्ही संस्थांना मनापासून धन्यवाद देतो. व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून या दोन्ही संस्थांना व्हेंटीलेटर देण्याबाबत आवाहन केले होते. त्याचबरोबर बेडचे नियोजनही करण्याचे आवाहन केले होते. पाचशे अडतीस बेडचे नियोजन केले आहे. त्यापैकी महासैनिक दरबार येथे 125 बेडची सुविधा देण्यात आली आहे. येत्या काळात या दोन्ही संस्थांनी नियोजन करुन ग्रामीण भागात कायमस्वरुपी सुविधा उभी करावी.' 
संग्राम पाटील म्हणाले, "बारा रोटरी क्‍लब एकत्र येऊन 62 लाख रुपयांच्या माध्यमातून 538 बेडची सुविधा निर्माण केली आहे. आयसोलेशन रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय येथेही स्वतंत्र रोटरी वॉर्ड करण्यात येणार आहे.' 
यावेळी क्रिडाईचे अध्यक्ष बेडेकर यांनी स्वागत केले. यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल प्रताप पुराणिक, प्रकाश जगदाळे, एस. एस. पाटील, उत्कर्षा पाटील, एम. वाय. पाटील, मेघना शेळके, योगिनी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT