Deforestation at Faye in Eco Sensitive Zone
Deforestation at Faye in Eco Sensitive Zone 
कोल्हापूर

इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये फये येथे वृक्षतोड

अरविंद सुतार


कोनवडे, कोल्हापूर : भुदरगड तालुक्‍यातील निसर्गसंपन्न व शासनाने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून आरक्षित केलेल्या फये परिसरातील वनक्षेत्रात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. वृक्षतोडीमुळे निसर्गाने नटलेला परिसर बोडका होण्याच्या मार्गावर आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. 
फये-हेदवडे परिसरात फये लघुपाटबंधारे प्रकल्प असल्याने पर्यटक येथे भेट देतात. पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे राजरोस वृक्षतोड सुरू आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. पण दुसरीकडे निसर्गसंपन्न फये परिसरात वृक्षतोड करून बोडका होत आहे. फये-हेदवडे हा परिसर शासनाने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून आरक्षित केला असताना देखील वृक्षतोड सुरू असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जंगल भागातील अष्टम, बाभूळ, निलगिरी, सिसम, उंबर, कडुनिंब, जांभूळ, धावडा, करंज आदींसह जंगली वृक्षांची राजरोस तोड होत असल्यामुळे निसर्गप्रेमी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. फये येथे तोडलेल्या लाकडाचे ढीग गावाच्या मध्यवस्तीत टाकले आहेत. परिसर उजाड बनविणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी निसर्गप्रेमींतून होत आहे. 


फये-हेदवडे हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून आरक्षित असल्याने सदर घटनेची माहिती घेऊन लाकूड तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 
- के. एस. आहेर, वनक्षेत्रपाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT