प्राथमिक आरोग्य केंद्र Canva
कोल्हापूर

धक्कादायक! प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसुती, अर्भकाचा मृत्यू

आरोग्य प्रशासानाचा हलगर्जीपणा नडला, पुलाची शिरोलीत प्रकार

सकाळ डिजिटल टीम

आरोग्य प्रशासानाचा हलगर्जीपणा नडला, पुलाची शिरोलीत प्रकार

शिरोली पुलाची : प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Primary Health Center) वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे महिलेची आरोग्य केंद्राच्या दारात वाहनातच प्रसूती झाली. दरम्यान अर्भकाची वाहनातच नाळ कापल्याने मृत्यू झाला. (Kolhapur) यामुळे दोषींवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत नातेवाईक, ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राच्या दारात ठिय्या मारला.

येथील माळवाडी भागातील एका गर्भवती पोटात दुखायला लागल्यामुळे प्रसूतीसाठी सकाळी ७ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात खाजगी वाहनातून आणले. यावेळी कर्मचाऱ्यांनी कळा सुटल्यावर या असे सांगून त्यांना परत पाठवले. (Kolhapur News) पुन्हा नऊ वाजता त्या आरोग्य केंद्रात आल्या; पण त्यांच्यावर उपचारास टाळाटाळ करत कर्मचाऱ्यांनी केंद्रात घेतले नाही. परिणामी खासगी वाहनातच प्रसूती झाली. त्यानंतर सकाळी साडेनउच्या सुमारास १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर आल्यावर अर्भकाची नाळ कापली. त्या वेळी अर्भक दगावले होते. त्यामुळे बेडेकर यांच्या नातेवाईकांनी आक्रोश करत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत उपचार केले नसल्याने अर्भक दगावल्याचा आरोप करीत कारवाईची मागणी केली.

सरपंच एस. बी. खवरे, उपसरपंच एस. बी. यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, सरदार मुल्ला, जोतिराम पोर्लेकर, अर्जुन चौगुले, योगेश चव्हाण, राहुल बेडेकर, संजय बेडेकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्युज यांना धारेवर धरले. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत दारात ठिय्या मांडला. यानंतर जिल्हा परिषदेचे माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

हातकणंगलेच्या सभापती डॉ. सोनाली पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अँड्र्युज यांची भेट घेऊन माहिती घेतली व सकाळच्या पाळीतील कर्मचारी येण्यापूर्वी रात्र पाळीतील कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंद्र का सोडले, असा प्रश्न उपस्थित केला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबीत करा, अशी मागणी सभापती डॉ. पाटील यांनी केली.

"पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आज झालेली घटना दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करून यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे."

- डॉ. फारुक देसाई, माताबाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT