कोल्हापूर

राजकीय ताकदीवरच कबनूर नगरपरिषदेचा प्रश्‍न लागणार मार्गी 

रवींद्र पाटील

कबनूर - कबनूर नगरपरिषद व्हावी, या मागणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी, विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी बेमुदत साखळी उपोषण करुन हा प्रश्‍न आता पुन्हा ऐरणीवर आणला आहे. यासाठी राजकीय ताकद किती लागते यावरच कबनूरचा हा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. 

कबनूर नगर परिषद व्हावी, यासाठी फक्त ठरावच झाले होते. आता मात्र त्याला आंदोलनाचे स्वरुप आले आहे. याप्रश्‍नी झालेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. या बेमुदत साखळी उपोषणावेळी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देताना कबनूर नगर परिषद झालीच पाहिजे, असा सूर सर्व नेत्यांचा होता. नगर परिषद झाल्याशिवाय कबनूर गावचा सर्वांगिण विकास अशक्‍य असल्याचे सांगत सद्यस्थितीतील गावातील विविध समस्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला. नगरपरिषदेबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांचाही यानिमित्ताने समाचार घेण्यात आला. ज्या गावात नगरपरिषद किंवा नगरपंचायत झालेल्या आहेत, अशा गावातील वस्तुस्थिती मांडली. नगर परिषदेबाबत कारण नसताना गैरसमज पसरवू नये, असे आवाहन केले. 

कबनूर नगरपरिषद व्हावी या मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषण करणाऱ्या युवकांनी खासदार धैर्यशील माने यांच्या आश्वासनानंतर बेमुदत साखळी उपोषण तात्पुरते स्थगित केले. तथापि बेमुदत साखळी उपोषण करणाऱ्या युवकांनी नगरपरिषदेचा प्रश्न प्रलंबित राहिला तर पुन्हा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी दिला. गावचा हा प्रश्‍न आता पून्हा ऐरणीवर आला आहे. गावात एकमताने याबाबत आंदोलन झाले. आणि राजकीय लोकांनीही हा प्रश्‍न उचलून धरला आहे. त्यामुळे हा प्रश्‍न तडीस जाणार काय, याची उत्सुकता पुढील काळात असणार आहे. (क्रमशः) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेत 65 हजार शेतकरी पात्र; 35 हजार जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

Mumbai News: १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले एक किलो चुंबक, डॉक्टरांनी वाचवला जीव; गंभीर आजाराने ग्रस्त

Latest Marathi News Live Update : इंग्रज फक्त केसरी आणि द मराठा या वृत्तपत्रांना घाबरायचे : अमित शहा

पंतप्रधान १०० टक्के योग्यच, पण दुसऱ्यांनाही आया असतात; १२ वर्षे तुमच्या लोकांनी केलं त्याची माफी कोण मागणार, राज ठाकरेंचा सवाल

Nashik Municipal Corporation : 'लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे'; मंत्री छगन भुजबळ यांनी कोणावर साधला निशाणा?

SCROLL FOR NEXT