Dengue sakal
कोल्हापूर

Dengue : कोल्हापुरात डेंगीचे रुग्ण वाढले, ३१ परिसर धोक्याचे

उघडीप देत पडणाऱ्या पावसाने शहरात डेंगी तसेच चिकुनगुनियासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यातून डेंगी रुग्णांची वाढती संख्या समोर येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - उघडीप देत पडणाऱ्या पावसाने शहरात डेंगी तसेच चिकुनगुनियासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यातून डेंगी रुग्णांची वाढती संख्या समोर येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील डेंगी व चिकुनगुनियासाठी विविध ठिकाणचे ३१ परिसर धोकादायक म्हणून निश्‍चित केले असून, त्यानुसार वारंवार सर्व्हे केले जात आहेत. तिथे डास अळ्यांच्या तपासणीबरोबरच सफाईबाबत अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.

महापालिकेच्यावतीने नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सर्व्हे सुरू केला आहे. आशा कर्मचारी तसेच केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने घराघरांत जाऊन तपासणी केली जात आहे. त्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणी सापडलेल्या डास अळ्या तसेच तापाचे रुग्ण, गरोदर मातांची संख्या, रक्त नमुन्यांची संख्या, गप्पी मासे सोडलेली ठिकाणे याची माहिती घेतली जात आहे.

आठवड्यात घेतलेले रक्ताचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले जात आहेत. यातून रुग्णांची संख्या दिसून येत असली तरी त्यापेक्षा किती तरी जादा तापाचे रुग्ण खासगी रुग्णालयात जातात. तिथे खासगी प्रयोगशाळेतून डेंगीबाबतचे अहवाल पाठवले जात असले तरी त्याला सरकारी पातळीवर मान्यता दिली जात नाही. पण, तापाचे रुग्ण ज्या भागात आढळतात, तिथे महापालिकेची यंत्रणा सर्व्हेला जात आहे.

सर्व्हे करताना प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रातील भागात कर्मचारी जात आहेत. पण, प्रत्येक केंद्राने यापूर्वी त्या परिसरात सापडलेल्या रुग्णांच्या आकडेवारीवरून काही परिसर धोकादायक (जोखमीचे) ठरवले आहेत. या परिसरात पथकांच्यावतीने अगदी काटेकोर तपासणी केली जात आहे.

त्याचबरोबर काही नवीन पथकेही त्या भागात तपासणीसाठी अचानक पाठवली जात आहेत. त्यातून तेथील रुग्णसंख्येची वस्तुस्थिती लक्षात घेतली जात आहे. जिथे संख्या जास्त जाणवते, तिथे सफाईबरोबरच धूर, औषध फवारणी, गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही केली जात आहे.

२७५ आशा कर्मचारी सर्व्हेसाठी आहेत. भागातील घरांना भेट देऊन जास्तीत जास्त वेळा तपासणीचे आदेश दिले आहेत. तसेच डास अळ्या सापडलेली भांडी, रक्ताचे नमुने यांच्या संख्येचा आढावा सतत घेतला जात आहे.

- डॉ. प्रकाश पावरा, आरोग्याधिकारी

हे आहेत धोकादायक परिसर

  • सावित्रीबाई नागरी आरोग्य केंद्र - जोशीनगर, पांजरपोळ, दौलतनगर

  • फिरंगाई नागरी आरोग्य केंद्र - शिवाजी पेठ

  • राजारामपुरी नागरी आरोग्य केंद्र - वाल्मिकीनगर

  • पंचगंगा नागरी आरोग्य केंद्र - दुधाळी, उत्तरेश्‍वर पेठ

  • कसबा बावडा नागरी आरोग्य केंद्र - कसबा बावडा, लाईन बाजार, कनाननगर

  • महाडिक माळ नागरी आरोग्य केंद्र - टेंबलाईवाडी, विक्रमनगर

  • आयसोलेशन नागरी आरोग्य केंद्र - सुभाषनगर, यादवनगर, बालाजी पार्क, रामानंदनगर, राजेंद्रनगर, वर्षानगर

  • फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्र - फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत

  • सदर बाजार नागरी आरोग्य केंद्र - सदर बाजार, विचारेमाळ, भोसलेवाडी, कदमवाडी, बापट कॅम्प

  • सिद्धार्नगर नागरी आरोग्य केंद्र - सिद्धार्थनगर, सीपीआर, रमणमळा, बुधवार पेठ

  • मोरेमानेनगर नागरी आरोग्य केंद्र - मोरे-मानेनगर, साळोखेनगर

जूनपासून रुग्ण वाढले

जूनमध्ये पावसाच्या कमी-अधिक प्रमाणात झालेल्या शिडकाव्यानंतर महिनाभरात डेंगीचे ४९ रुग्ण आढळून आले; पण जुलैच्या पहिल्या चार दिवसांतच १३ रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेने सर्व्हेचा वेग वाढवला. तसेच तपासणीला देण्यात येणाऱ्या रक्त नमुन्यांची संख्याही वाढवली. आताही पाऊस थांबून-थांबून येत असल्याने रुग्ण संख्या वाढण्याचा धोका आहे. त्यासाठी ज्या भागात इमारतींमध्ये वा अन्य काही व्यवसायांच्या ठिकाणी पाणी साचते, त्याची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

... तर रुग्ण संख्या वाढण्याचा धोका

गेल्या आठवड्यात झालेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणात डास अळ्या असलेली भांडी आढळून आली. त्यातून तयार झालेल्या डासांचा परिणाम जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दिसू शकतो. त्यामुळे जर पावसाचे प्रमाण असेच राहिले तर रुग्ण संख्या वाढण्याचा धोका आहे.

नागरिकांनी घ्यावी ही दक्षता

  • घराच्या परिसरातील पाणी साचणारी भांडी रिकामी करावी.

  • कुंडी, फ्रीज, टेरेसवर पडलेले साहित्य, खराब टायर यांच्यातील पाणी काढावे.

  • डेंगीचा डास दिवसा चावतो. त्यासाठी क्रीमचा वापर करावा.

  • अंग झाकले जाईल, असे कपडे वापरावेत.

  • भागातील पाणी साठणाऱ्या ठिकाणांची माहिती महापालिकेला द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT