kolhapur flood e-sakal
कोल्हापूर

पंचनामे करायला अधिकारीच नाहीत; मत्स्य विकास कार्यालयातील स्थिती

परिणामी महापुराने झालेल्या नुकसानीचे पंचनामेच कोण करणार, असा प्रश्‍न आहे.

- लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : महापुराने (kolhapur flood) मासे वाहून गेले, मत्स्यबीजचा चिखल झाला, मात्र त्यांचे पंचनामे करण्यासाठी जिल्ह्यातील मत्स्य विकास विभागात अधिकारीच नाहीत. प्रत्येक तालुक्याला एक अधिकारी द्या, अशी मागणी विभागातून केली. त्यानंतरच ज्यांची नियुक्ती झाली तेही अद्याप हजर नाहीत. परिणामी महापुराने झालेल्या नुकसानीचे पंचनामेच कोण करणार, असा प्रश्‍न आहे. लाखांत नुकसान होऊनही हजारात भरपाई मिळणार आहे. मात्र, पंचनाम्यासाठी यंत्रणा नसल्याने नाराजीचा सूर आहे. (kolhapur news)

काहींनी मत्स्यबीज उत्पादनासाठी शिरोळ तालुक्यात २५-३० लाखांचे भांडवल घातले; त्यांच्याकडून जिल्ह्याला, तसेच दक्षिण महाराष्ट्रालाही (south maharashtra) मत्स्यबीज दिले जात होते. तोच प्रकल्प पाण्यात गेल्यामुळे आता मत्स्यबीज पुरवठ्यावरही मर्यादा आल्या आहेत. शहरासह जिल्ह्यात साधारण ५३ हून अधिक तलावात मासेमारी होत असून, संस्था किंवा खासगी ठेकेदार नेमले आहेत. धरणातही मासेमारी होते. मत्स्यविकास सोसायट्या, ठेकेदार, खासगी मच्छीमार, असे अनेक घटक या मासेमारीवर अवलंबून आहेत.

तूर्त १३ मे २०१५ च्या परिपत्रकानुसार मदत देण्याचे निश्‍चित आहे. सध्या कार्यातील सहायक आयुक्तपद रिक्त आहे. दहा मंजूर पदे असताना प्रत्यक्षात सातच आहेत. त्यापैकी दोनच अधिकारी तांत्रिक आहेत, त्यापैकी एकाकडे सहायक आयुक्तपदाचाही कार्यभार आहे. त्यामुळे पंचनामे करायचे कोणी, असा प्रश्‍न आहे. १२ अधिकारी येणार आहेत, मात्र आजपर्यंत कोणीही आलेले नाहीत.

- सतीश खाडे, प्रभारी सहायक आयुक्त, मत्स्य विकास विभाग

शिरोळ तालुक्यात जमीन नापीक आहे, त्या ठिकाणीच मत्स्यबीज उत्पादनासाठी जमीन उपयुक्त असते. तेथे ३ हेक्टर जमिनीवर सुमारे ३० लाखांचे मत्स्यबीज तयार केले जात होते. ते सर्व महापुरामुळे वाहून गेले. साधारण २५ लाखांचे नुकसान झाले आहे. भरपाई हेक्टरी विचारात घेतली, तर २५ हजारांच्या आसपास मिळेल, तरीही पंचनामेच झालेले नाहीत. त्यामुळेच मच्छीमार नाराज आहेत.

- नामदेव तिकोणे, मस्‍त्यबीज उत्पादक, शिरोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादांचे आरोप १०० टक्के खरे, भ्रष्टाचाराचा कळस त्यांनीच केलाय; सत्ताधारी आणि विरोधकही चोर, तत्कालीन अभियंत्याचेही खुलासे

Latest Marathi News Live Update : नागपुरात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण

Yavatmal Crime: यवतमाळमध्ये शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या; शेती पत्नीच्या नावावर कर, मारहाणीची धमकी अन्..

India Afghanistan Trade : भारताने अफगाणिस्तानसोबतचा व्यापार थांबवला ? इराणमधील संघर्षादरम्यान पाकिस्तानचा दावा

Ayodhya Darshan: अयोध्येत आता वेटिंग लिस्ट संपणार! राम मंदिरातील १४ उप-मंदिरांसाठी येणार 'स्पेशल पास'; पाहा काय आहे नवा नियम

SCROLL FOR NEXT