Desire To Come To Ganeshotsav; But Quarantine Is A Problem Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गणेशोत्सवाला येण्याची इच्छा; पण क्वारंटाईनचा मुद्दा ठरतोय अडचणीचा...चाकरमानी द्विधा मन:स्थितीत!

अवधूत पाटील

गडहिंग्लज : गणेशोत्सव महत्त्वाच्या सणांपैकी एक. त्यामुळे पुण्या-मुंबईसह बाहेरगावी असणाऱ्या बहुतांश जणांचा या उत्सवाला गावी येण्याकडे कल असतो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परतलेले काही चाकरमानी अद्याप गावीच आहेत. मात्र, अनेकांनी पुण्या-मुंबईतच थांबणे पसंत केले होते. गणेशोत्सवाला गावी हजेरी लावण्याबाबत त्यांच्यात द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे. गावी यायचे तर आहे; पण संस्थात्मक क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करून उत्सवाला थांबणे अडचणीचे ठरत आहे. 

चाकरमान्यांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. उन्हाळी सुटीत गावी येणे शक्‍य न झाल्याने उत्सवाच्या निमित्ताने तरी येण्याची त्यांची इच्छा आहे. काही जणांच्या घरी आई-वडीलच राहतात. स्वत: पत्नी-मुलांसह नोकरीच्या ठिकाणी राहत असल्याने दरवर्षी उत्सवाला येणे अपरिहार्य बनते. पण, गणेशोत्सवाला गावी यायचे तर संस्थात्मक अलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण करणे सक्तीचे आहे. त्यानंतरच त्यांना घरी जाणे शक्‍य होईल. त्यासाठी उत्सवाच्या आधी 15 दिवस यावे लागणार आहे. म्हणजेच चार-पाच दिवसांच्या उत्सवासाठी 20 दिवसांची सुटी घ्यावी लागेल. हीच बाब चाकरमान्यांसाठी अडचणीची ठरत आहे. 

दक्षता समितीची कोंडी... 
गणेशोत्सवासाठी गावी येण्याबाबत चाकरमान्यांकडून दक्षता समिती, ग्रामपंचायतीकडे विचारणा होत आहे. क्वारंटाईनमध्ये सवलत देण्याचा आग्रह त्यांच्याकडून केला जातो. पण, सवलत द्यायची कशी, हा प्रश्‍न आहे. शिवाय, सवलत देण्याचा अधिकारही नसल्याने दक्षता समितीची कोंडी होते. 

सध्या 30 शाळांत विलगीकरण केंद्र 
परजिल्ह्यांतून येणाऱ्या व्यक्तींच्या संस्थात्मक विलगीकरणाची सोय गावातच करण्यात आली होती. सुरवातीला 54 प्राथमिक आणि 36 माध्यमिक शाळांत विलगीकरण केंद्र होते. सध्या 30 शाळांमध्ये विलगीकरण केंद्र कार्यरत आहे. अन्य गावांतील केंद्र सध्या बंद असले तरी गरजेनुसार त्या ठिकाणी पुन्हा विलगीकरणाची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

संस्थात्मक अलगीकरण होणे सक्तीचे
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संसर्ग वाढणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. पुणे-मुंबईसह परजिल्ह्यांतून येणाऱ्यांनी नियमाप्रमाणे संस्थात्मक अलगीकरण होणे सक्तीचे आहे. 
- दिनेश पारगे, तहसीलदार, गडहिंग्लज 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT