kolhapur latest political news  
कोल्हापूर

'आमचं ठरलंय म्हणणाऱ्यांना आता भाजपची ताकद दाखवून देऊ'

'जिल्ह्यात आमचं ठरलंय म्हणायचं आणि सगळं घ्यायचं, एवढंच सुरू आहे'

सकाळ डिजिटल टीम

'जिल्ह्यात आमचं ठरलंय म्हणायचं आणि सगळं घ्यायचं, एवढंच सुरू आहे'

इचलकरंजी - जिल्ह्यात आमचं ठरलंय म्हणायचं आणि सगळं घ्यायचं, एवढंच सुरू आहे. त्यामुळे विकासकामे सोडून इतर सर्व कार्यक्रम अगदी व्यवस्थित सुरू आहेत, अशी खरमरीत टीका राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता केली. (kolhapur latest political news)

राज्यसभा निवडणुकीनंतर महाडिक आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सांगलीतील कार्यक्रमात सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीका केली होती. त्याला महाडिक यांनी येथील कार्यक्रमात प्रत्त्युत्तर दिले आहे. यावेळी महाडिक म्हणाले, की आता आमचं ठरलंय म्हणणाऱ्यांना भाजपची ताकद दाखवून देऊ. याच ताकदीने आता एकत्र नियोजन करून येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुकीत चित्र बदलणार आहे. त्या विजयाची सुरुवात झाली असून, पुढील काळात सर्वच निवडणुकीत केवळ भाजपच दिसेल.

येथील शतकोत्तर इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने कर तोडण्याचा कार्यकम झाला. त्यावेळी बेंदूर कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते महाडिक यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर वस्त्रनगरीत शतकोत्तर परंपरा असलेल्या इचलकरंजीत कर्नाटकी बेंदराची कर यंदा धाकल्या पाटील बैलाने तोडली. गावभागातील जुनी गावचावडी येथे मानाचा पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम झाला.

लाकूड ओढणे शर्यती, तसेच बेंदूर उत्सव समितीतर्फे श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात भरविलेल्या जनावरांच्या प्रदर्शनातील उत्कृष्ट असलेल्या जनावरांना वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसे देण्यात आली. यावेळी बाबासाहेब चौगुले, डॉ. राहुल आवाडे, स्वप्निल आवाडे, आदित्य आवाडे, राहुल घाट, नरसिंह पारिक, गजानन लोंढे, प्रशांत कांबळे, बाळासाहेब कलागते, नंदू पाटील, राजेंद्र बचाटे, संपत जामदार, सागर मगदूम, अहमद मुजावर, पापालाल मुजावर यांसह कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेंदूर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT