Dhotri training is still a support for the poor kids
Dhotri training is still a support for the poor kids  
कोल्हापूर

कुस्तीसाठी येणाऱ्या गरीब पोरांसाठी धोत्री तालीम आजही आधारवड 

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर आणि कुस्ती, पटसोंगट्या, मर्दानी खेळाबरोबरच त्र्यंबोली यात्रा हे एक अतूट समीकरण. गंगावेशपासून अवघ्या शंभर-दीडशे मीटरवर असलेल्या धोत्री तालीम व्यायाम मंडळानेही ही परंपरा बदलत्या काळात आजही जपली आहे. त्र्यंबोली यात्रेच्या निमित्ताने उंबऱ्याला केवळ दहा रूपये वर्गणीची परंपरा या तालमीने आजही कायम ठेवली आहे. त्याशिवाय परगावाहून कोल्हापुरात कुस्तीसाठी येणाऱ्या गरीब कुटुंबांतील पोरांसाठी ही तालीम आधारवड ठरली आहे. 

धोत्री तालीम व्यायाम मंडळ ही तालीम कुस्तीसाठी प्रसिद्ध. तालमीची स्थापना 1890 ची. साहजिकच गेल्या 130 वर्षांचा इतिहास पहाता या तालमीने पूर्वापार चालत आलेल्या सर्व परंपरा आजही जपल्या आहेत. परिसरातीलच तातोबा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्ल येथे घडले. पांडूरंग राबाडे, राजाराम राबाडे, राजाराम सावंत, पांडूरंग बिराडे आदी मंडळींनी कुस्त्यांचे अनेक फड गाजवले. हा सारा कुस्तीचा सुवर्णकाळ अनुभवलेले तालमीचे मल्ल राजाराम राबाडे आजही तालमीच्या विविध कार्यक्रमात सक्रीय असतात. सध्या त्यांचे वय आहे एकोणनव्वद. ते सांगतात, ""तालमीने कुस्तीची आणि व्यायामाची परंपरा पहिल्यापासून जपली. "काय बी कर. पण, व्यायाम कर' हा तालमीतील ज्येष्ठांचा परिसरातील सर्व तरूणांना नेहमीच सल्ला असायचा. त्या काळात खासबागला कुस्त्यांची मैदानं सतत व्हायची. आम्ही तालमीच्या वतीने या मैदानात हमखास उतरायचो. त्याशिवाय जिल्ह्यातील विविध कुस्त्यांच्या फडातही आमची हमखास हजेरी असायची. कुस्ती मारली की त्या काळात दहा किंवा पंधरा रूपये बक्षीस मिळाले तरी आमचा सर्व खर्च भागायचा. वीस रूपये बक्षीस म्हणजे फारच मोठी रक्कम. तालमीत पाय ठेवायचा तर कुठलेही व्यसन चालायचे नाही. आम्ही साधा चहा प्यायला लागलो तोही लग्न झाल्यानंतरच.'' 
धोत्री तालीम कुस्तीबरोबरच पटसोंगट्या, मर्दानी खेळातही दबदबा असणारी तालीम. भवानी मंडपात पूर्वी होणाऱ्या स्पर्धांतही अनेक बक्षीसांची मानकरी तालीम ठरली ती तालमीच्या चपळ शिवकालीन युद्धकलापट्टूंच्या जोरावरच. तालमीतर्फे त्र्यंबोली यात्राही धुमधडाक्‍यात साजरी व्हायची. त्यावेळी उंबऱ्याला दोन रूपये पट्टी निघायची आणि त्यापोटी प्रत्येक घरात अर्धा किलो मटणाचा वाटा मिळायचा आणि दिवसभर "चांगभलं'च्या गजरात सारा परिसर आषाढातील आनंदोत्सवात न्हावून निघायचा, अशा आठवणीही श्री. राबाडे सांगतात. 

तालमीची सध्या तीन मजली इमारत आहे. तळमजल्यावर लाल मातीचा आखाडा, दुसऱ्या मजल्यावर अत्याधुनिक व्यायामशाळा आणि तिसऱ्या मजल्यावर पैलवानांच्या निवासाची व्यवस्था आहे. तालमीच्या महादेव मंदिरातही विविध धार्मिक विधी सुरू असतात. गणेशोत्सवाबरोबरच मोहरम, महाशिवरात्र, त्र्यंबोली यात्रा आणि शिवजयंती व राजर्षी शाहू जयंतीचे कार्यक्रम तालमीतर्फे होत असतात. त्याशिवाय नवी पिढी आता विविध सामाजिक उपक्रमांवरही भर देत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे परगावाहून कुस्तीसाठी कोल्हापुरात येणाऱ्या गरीब घरातील पोरांसाठी ही तालीम आजही आधारवड ठरली आहे. अत्यंत अत्यल्प दरात पैलवानांच्या निवासाची व्यवस्था तालमीने केली आहे. 


तालमीचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, उपाध्यक्ष संजय जाधव यांच्यासह कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली तालमीची परंपरा आम्ही नेटाने पुढे नेत आहोत. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व सण व उत्सव आजही तालमीच्या खर्चातूनच केले जातात. 
- राजेंद्र भोसले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT