did not see the usual enthusiasm in the pottery ... 
कोल्हापूर

गडहिंग्लजला कुंभारवाड्यात नेहमीचा उत्साह दिसेना... 

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज :  दोन महिन्यावर गणेशोत्सव आला असला तरी कुंभारवाड्यात नेहमीचा उत्साह शोधावा लागत आहे. कोरोनाच्या सावटाखाली यंदा गणेशोत्सव होणार असल्याने मूर्तिकारांच्या हालचाली थंडावलेल्या आहेत. केवळ घरगुती मूर्तींचे काम सुरू आहे. दरवर्षी सुमारे पाच हजाराहून अधिक गणेशमूर्ती या ठिकाणी साकारल्या जातात. शहर परिसरासह लगतच्या आजरा व चंदगड तालुक्‍यातही मंडळांच्या मोठ्या मूर्तींना मागणी असते. मात्र, यंदा कोरोनामुळे उत्सवाबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने कलाकार दबकतच काम करताना दिसत आहेत. 

दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी तीन-चार महिन्यांपासून कुंभारवाड्यात मूर्तीकामाच्या हालचालींना वेग येतो. सुरुवातीच्या टप्प्यात मूर्ती ठेवण्यासाठी मंडपाची उभारणी, कच्च्या साहित्याची जमवाजमव यावर भर दिला जातो. अडीच महिन्यापासून प्रत्यक्ष मूर्तीकामाला प्रारंभ होतो. येथील नदीवेस परिसरात असणाऱ्या कुंभारवाड्यात तीसहून अधिक कुटुंब गणेशमूर्ती बनवितात. अधिक आकर्षकतेमुळे येथील मूर्तींना मोठी मागणी असते. शहरासह ग्रामीण भाग आणि लगतच्या आजरा, चंदगड या ठिकाणची सार्वजनिक मंडळे मोठ्या गणेशमूर्ती नेतात. 

यंदा जून महिना संपत आला तरी मूर्तीकामांना म्हणावा इतका वेग आलेला नाही. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा दणका बसला आहे. मूर्तींच्या मागणीबाबत कलाकारांत शंकेचे चित्र आहे. अधिक आणि मोठ्या मूर्ती केल्या आणि त्या विकतीलच याची शाश्‍वती नसल्याने केवळ घरगुती लहान मूर्तीनाच सध्या प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. मातीच्या मूर्ती दुर्मिळ आहेत. त्या साकारण्यासाठी वेळही अधिक लागत असल्याने बहुतांशी पीओपी मूर्तीनाच कलाकारांची अधिक पसंती आहे. 

सार्वजनिक मंडळांकडून अद्याप गणेशमूर्तींची मागणी नोंदवलेली नाही. दरवर्षी 50 हून अधिक मंडळासाठी मोठ्या मूर्ती बनवितो. मात्र, सध्या धोका न स्वीकारता केवळ घरगुती लहान मूर्ती तयार करण्यावरच लक्ष दिले आहे. 
- सुनील विष्णू कुंभार, मूर्तिकार, गडहिंग्लज 
-- 
दृष्टिक्षेप ः 
- गणेश मूर्तिकारांच्या हालचाली थंडावलेल्या 
- आजरा, चंदगड तालुक्‍यातील मंडळांकडून मोठ्या मूर्तींना मागणी 
- केवळ घरगुती मूर्तींचे काम सुरू 
- कुंभारवाड्यात तीसहून अधिक कुटुंबे गणेशमूर्ती बनवतात 

कोल्हापूर

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT