A difference of twelve inches in feet; 51 lakh concession to hospital income 
कोल्हापूर

फुटात बारा इंचाचा फरक ; रुग्णालय मिळकतीला  51 लाखाची सवलत

डॅनियल काळे

कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागातील त्या चौघांच्या कारनाम्यांनी महापालिका हादरुन गेली आहे. बड्या धेंड्यांवर सवलतीची खैरात करताना महापालिकेचा किती महसूल आपण बुडवितो, याचे भानही त्यांना राहिले नाही.

शहरातील एका हॉस्पीटलच्या इमारतीलाही तब्बल 51 लाखाची सवलत दिली आहे. ही सवलत संबधित मालकाला देण्यासाठी 15 वर्षे उशिराने घरफाळा लागू केल्याने करदान नियमावलीलाच हरताळ फासल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

घरफाळा विभागात झालेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. हस्तलिखित पावत्यांपासून ते अद्यावत संगणक प्रणालीपर्यंत सर्वच पातळीवर या टोळीने भ्रष्टाचार करत उत्पन्नालाच गळती लावली आहे. ही गळती लावताना कूळ वापरातील व्यावसायिक इमारती हे या टोळीचे टार्गेट होते. बड्या धेंडाचा घरफाळा कमी करण्यासाठी या टोळक्‍याने नामी शक्कल लढविली. बुध्दीमता पणाला लावली, एकेक फॉर्म्युला सक्‍सेह होत जाईल, तसे त्यांचे धाडस वाढत गेले आणि बघता बघता या टोळक्‍याने कोट्यावधींच्या महापालिकेच्या महसूलालाच पोखरले. 


शहराच्या मध्यवर्ती भागातील एका रुग्णालयाची इमारत. त्याला दरमहा 30 हजार रुपये भाडे असल्याचे भासवून भाडेकराराप्रमाणे या इमारतीची कर आकारणी केली. पण 2004 ते 2019 पर्यंत केलेली ही कर आकारणी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कर आकारणी करताना सर्वच नियमांना हरताळ फासला आहे. कर आकारणी करताना सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कर आकारणी अंतिम होणे आवश्‍यक होते. या मिळकतीच्या सर्व करप्रणालीत महापलिकेचे सुमारे 51 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 


9 वर्षांनी चुकीचा साक्षात्कार 
कर चुकवेगिरीची ही वृत्ती लपविण्यासाठी अनेकांनी या पध्दतीलाच दोष देउन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. 2011 पासून ही पध्दती शहरात लागू आहे. पण या चुकीच्या पध्दतीचा साक्षात्कार 9 वर्षांनी झाला आहे. भष्ट्राचार ही एक वृत्ती आहे. कोणत्याही सिस्टिममधील त्रुटी शोधून भ्रष्टाचार करणारी टोळकी पोळी भाजून घेतात. बड्या धेंडाच्या अर्थिक हितासाठी घरफाळा विभागातील घर भेदीनीच महापालिकेला कसे खड्ड्यात घातले,याचा हा नमुना आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT