different movement for the salaries of transport workers in belgum 
कोल्हापूर

परिवहन कर्मचाऱ्यांनी वेतनसाठी उभारलीय 'ही' वेगळीच चळवळ...

महेश काशिद

बेळगाव - कोरोनाचा विविध घटकावर परिणाम झाला आहे. वायव्य परिवहन मंडळाला मोठी झळ बसली आहे. संस्थेचे चाके आर्थिक अडचणीमध्ये रुतली आहेत. परिणामी परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देणे शक्‍य झालेले नाही. यामुळे परिवहन मंडळातर्फे कर्मचाऱ्यांकडून ट्‌विट चळवळ हाती घेतली जात आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर परिवहन मंडळाकडून बस सेवा बंद केली गेली. पण, गेल्या महिन्यांत लॉकडाऊन शिथिल केले. बससेवा सुरु झाली. पण, सेवा अजून पूर्ण क्षमतेने सुरु झाली नाही. बसमधून लहान मुले आणि वृध्दांना प्रवास न करणे, सोशल डिस्टस्टिंग पाळणे आणि मास्क परिधान करण्याची अट घालण्यात आली आहे. यासाठी प्रवाशी बसमधून प्रवास करताना घाबरत आहेत. शिवाय गर्दीमधून प्रवास केल्यामुळे कोरोना संसर्गची धास्ती कायम आहे. त्यासाठी बसमधून प्रवास करण्यास अनास्था दाखवली जात आहे. या कारणांनी परिवन मंडळाला आर्थिक फटका बसत आहे. गेल्या चार महिन्यांपासून संस्थेच्या नुकसानात वाढ झाली आहे. 
कर्मचाऱ्यांकडून सातत्याने वेतनाबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर एप्रिल व मे महिन्यांतील वेतन मिळाले. पण, जून महिन्यांचे वेतन थकीत आहे. कर्मचाऱ्यांकडून सातत्याने वेतनची विचारणा केली जाते आहे. त्याला प्रतिसाद मिळत नाही. लाखो कर्मचारी चातकाप्रमाणे वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे या प्रश्‍नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ट्विट चळवळ हाती घेण्यात आली आहे.

विशेष म्हणजे वाहव्य परिवहन मंडळाच्या ट्‌विट चळवळीत मृत्यूंजय स्वामी, ज्येष्ठ साहित्यिक रमझान दर्गाह, मठाधीश आणि लेखकांनी भाग घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत. वायव्य परिवहन मंडळ मुलभूत हक्क मंच नावाने संघटना स्थापना करून सर्व कर्मचारी आणि संघटना लढा देत आहेत. केंद्र, राज्य सरकार आणि मंडळाचे (निगम) कर्मचारी नियोजित वेळेत वेतन घेत आहेत. पण, परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना नियोजित वेळेत वेतन देण्यासाठी सातत्याने राज्य सरकार चालढकल करत आहे. कामाच्या मोबदल्यात वेतन कर्मचारी मागत आहेत, ते देण्यासाठी चालढकल सुरु झाल्यामुळे लढ्याची दिशा व्यापक बनवली जाणार आहे. 

75 टक्के वेतनचा प्रस्ताव 

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी हुबळी येथील दौऱ्यात परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून दोन महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून, या वेळीही राज्य सरकारच वेतन देणार आहे. पण, ते 75 टक्के असणार आहे, अशी माहिती सवदी यांनी दिली आहे. 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

Pune: पुण्यातील शाळेत तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळणार; प्राथमिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे धडे

Devendra Fadnavis Virar : "वसई-विरारमधील एकाही गरिबाचे घर तोडू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन!

Pune Election Bribery : पुण्यात संक्रांतीच्या नावाखाली मतांची खरेदी; प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी!

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

SCROLL FOR NEXT