The Difficulty Of Customers Doing Digital Transactions Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

ऑनलाईन पेमेंट, गॅस सिलिंडर लेट!...डिजिटल व्यवहाराचा असाही फटका

अवधूत पाटील

गडहिंग्लज : केंद्र सरकारने डिजिटल आर्थिक व्यवहाराचा आग्रह धरला. सध्याच्या धावत्या युगात असा आग्रह योग्यच म्हणावा लागेल. त्यामुळे अनेकांनी डिजिटल व्यवहाराला प्राधान्य दिले आहे. पण, घरगुती गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना वेगळ्याच अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अन्य ग्राहकांच्या तुलनेत त्यांना गॅस सिलिंडरचे वितरण विलंबाने होत आहे. ग्राहकाने केलेले डिजिटल पेमेंट गॅस कंपनीकडून वितरकाला उशिरा मिळत असल्याने ही परिस्थिती उद्‌भवत आहे. गॅस कंपन्यांनी या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

घरगुती गॅस ही आता प्रत्येकाची अत्यावश्‍यक गरज आहे. दिवसेंदिवस वापरकर्त्यांची संख्याही वाढत आहे. विशेषत: केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर त्यामध्ये कमालीची वाढ झाली. रॉकेलमुक्त गाव आणि धूरमुक्त घर धोरण अवलंबले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे तर दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांच्या घरातही घरगुती गॅस आला. घरगुती गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी आधी बुकिंग करावे लागते. केंद्रीय पद्धतीने एका कॉलवर हे बुकिंग होते. पूर्वी वितरकांच्या गोदामामध्ये जाऊन गॅस सिलिंडर घ्यावे लागत होते. आता वितरकाकडून थेट ग्राहकांच्या दारात सिलिंडर पुरविले जाते. 

गॅस सिलिंडरसाठी बुकिंग केल्यानंतर त्याच नंबरवर कंपनीकडून मेसेज येतो. यातील लिंकवर जाऊन अनेक ग्राहकांकडून ऑनलाईन पेमेंट केले जाते. ग्राहकाने ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर सदरची रक्कम गॅस कंपनीकडे जाते. गॅस कंपनीकडून ती वितरकांच्या नावावर वर्ग केली जाते. त्यानंतरच वितरकाकडून संबंधित ग्राहकाला सिलिंडर पुरविले जाते. मात्र, या साऱ्या प्रक्रियेत तीन-चार दिवसांचा कालावधी जात आहे. परिणामी, डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना रोखीने पैसे देऊन सिलिंडर घेणाऱ्यांच्या तुलनेत उशिरा गॅस सिलिंडर मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

शासनाच्या प्रयत्नाला खो... 
प्रत्येक क्षेत्रात डिजिटल व्यवहार वाढावेत यासाठी शासकीय पातळीवरून विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असताना गॅस कंपन्यांच्या धोरणामुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसमोरच अडचणी उभ्या राहत आहेत. विशेष म्हणजे वितरकांनी ग्राहकांची होणारी अडचण गॅस कंपन्यांच्या निदर्शनास आणूनही दिली आहे. मात्र, गॅस कंपन्यांकडून अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. यामुळे ग्राहक डिजिटल व्यवहारापासून परावृत्त होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

kolhapur

संपादन : सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT