The dismissal of NCP workers on the Legislative Council 
कोल्हापूर

विधान परिषदेवर "राष्ट्रवादी'च्या  कार्यकर्त्यांना पदाची हुलकावणीच 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या 12 जागांपैकी "राष्ट्रवादी'च्या वाट्याला आलेल्या चार जागांतील एका जागेवर कोल्हापुरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांची निवड निश्‍चित आहे. परिणामी, या घडामोडींमुळे या पदासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची संधी मात्र हुकेल. 
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या जागा 20 जूनला रिक्त झाल्या आहेत. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार आल्यावर या तिन्हीही पक्षांना प्रत्येकी चार जागा वाट्याला येतात. ऑक्‍टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राधानगरी मतदारसंघातून "राष्ट्रवादी'कडून ए. वाय. पाटील इच्छुक होते. तथापि, पक्ष नेतृत्वाने माजी आमदार के. पी. पाटील यांना पुन्हा एकदा संधी दिली. के. पी. यांच्या प्रचारार्थ भुदरगडमध्ये झालेल्या प्रचार सभेत "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी ए. वाय. यांना योग्य संधी देण्याचे आश्‍वासन जाहीर सभेत दिले होते. त्यातून ए. वाय. यांची विधान परिषदेवर नियुक्ती निश्‍चित समजली जात होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या निवडीची प्रक्रिया थांबली. त्यामुळे या संदर्भातील चर्चाही ठप्प झाली होती. 
दोन दिवसांपासून मात्र मुंबईत विधान परिषदेच्या या 12 जागांच्या नियुक्तीसाठीची खलबते सुरू आहेत. सरकारमधील तिन्हीही पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळणार, यावरही एकमत झाले. त्यात "राष्ट्रवादी'च्या कोट्यातून श्री. शेट्टी यांची निवड निश्‍चित समजली जाते. त्यांच्याशिवाय गायक आनंद शिंदे यांचेही नाव आघाडीवर आहे. कोल्हापुरातून श्री. शेट्टी यांना संधी दिल्यावर पुन्हा पक्षातील कोणाला संधी मिळण्याची शक्‍यता धुसर आहे. त्यामुळे ए. वाय. यांची ही संधी हुकणार, हेही निश्‍चित आहे. 


आज निर्णय होण्याची शक्‍यता 
"राष्ट्रवादी'च्या कोट्यातील उर्वरित दोन जागांपैकी एका जागेवर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. श्री. खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर "राष्ट्रवादी'त प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा पक्षप्रवेश झाल्यास पक्षाच्या वाट्याच्या तीन जागांवरील निवडी निश्‍चित आहेत. उर्वरित एका जागेवर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे ए. वाय. यांच्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. उद्या (ता. 15) यासंदर्भातील अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी! राज्यात ९००० शिक्षकांची भरती; मे २०२६ पर्यंतची रिक्त पदे भरणार; पवित्र पोर्टलद्वारेच भरती प्रक्रिया; ‘टीईटी’चा निकाल याच महिन्यात

फलटण तालुका हादरला! सस्तेवाडीत मध्यरात्रीत एकाचा खून; दोघांना अटक, शेतात ससे पकडण्यास गेला अन् काय घडलं?

आजचे राशिभविष्य - 07 जानेवारी 2026

Cafe Style Grilled Sandwich: कॅफेस्टाइल ग्रिल सँडविच बनवा आता घरच्या घरीच ! फक्त तवा अन् ‘ही’ सोपी ट्रिक वापरा

SCROLL FOR NEXT