Political
Political esakal
कोल्हापूर

'बॅंक निवडणुकीत जास्तीत जास्त जागा बिनविरोध करण्याच प्रयत्न'

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांची बॅंक असल्यानं राजकारण न करतचा जास्तीत जास्त बॅंकेला फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न

कोल्हापूर - आगामी काळात जिल्हा बँकेला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. निवडणूकीत जास्ती जास्त जागा बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र तालुक्याचे राजकारण वेगळं असल्यानं काही ठिकाणी अडचणी आहेत. शेतकऱ्यांची बॅंक असल्यानं राजकारण न करतचा जास्तीत जास्त बॅंकेला फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न असणारा आहे असे मत आज ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patl) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुश्रीफ बोलत होते.

ते म्हणाले, कोल्हापुरसह राज्यातील सर्व बँकांच्या निवडणुका होणार होत्या. आजपासून कोल्हापूरच्या जिल्हा बँकेची निवडणूक रणधुमाळी सुरु झाली आहे. प्राध्यापक संजय मंडलिक, भैय्या माने आणि मी स्वत: महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दाखल करत आहे. यापुढेही जास्तीजास्त शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक वाहिनी म्हणून जिल्हा बॅंक काम करेल. या निवडणूकीत जास्तीत जास्त जागा बिनविरोध होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. तालुक्याचे राजकारण वेगळं असल्यानं काही ठिकाणी अडचणी आहेत. मात्र अगामी काळात जिल्हा बँकेला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. सत्तेत असताना जिल्हा बँकेचा संचित तोटा जास्त होताना, तो कमी करून सुमारे दीडशे कोटींचा नफा मिळवून दिला आहे. सर्वाधिक आयकर भरणारी ही जिल्हा मध्यवर्ती बँक एक नंबरची ठरली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT