election esakal
कोल्हापूर

9 जागा बिनविरोधसाठी हालचाली; ‘गॉडफादर’ नसलेल्यांचा जाणार बळी

जिल्हा बँकेचे राजकारण; राखीव गट बिनविरोध करण्याच्या हालचाली

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तालुका संस्था गटातील काही जागांची निवडणूक लागणार हे जवळपास निश्‍चित असले तरी राखीव गटातील नऊ जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणूक बिनविरोध करताना त्यात सर्व घटकांना सामावून घ्यावे लागणार आहे. परिणामी जिल्हा बँकेच्या राजकारणात ‘गॉडफादर’ नसलेल्यांचा बळी जाण्याची शक्यता आहे.

कागलसह करवीर, हातकणंगले, पन्हाळा तालुका संस्था गटातून प्रबळ उमेदवार नाही. गनबावडा तालुका गटातून पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) बिनविरोध निश्‍चित आहेत. चंदगड तालुक्यातही आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) व माजी मंत्री भरमू पाटील (Bharmu Patil)यांच्यात पंचायत समिती निवडणुकीपर्यंतचा ‘समझोता’ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे उर्वरित सहा तालुक्यात तुल्यबळ लढतीची शक्यता आहे. या लढती होत असताना महिला व प्रक्रिया संस्था गटातील प्रत्येकी दोन गटातील जागांसह एकूण नऊ जागा बिनविरोध करून संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी आमदार पी. एन., डॉ. विनय कोरे यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केली. यात आवाडे यांनी दोन जागा मागितल्या आहेत. विद्यमान संचालक विलास गाताडे यांची जागा कायम राखून पतसंस्था गटातून स्वतः आवाडे इच्छुक आहेत. या गटातून अनिल पाटील प्रतिनिधीत्त्व करतात. उपद्रव्य मूल्य नसलेल्या पाटील यांना थांबवण्यात बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ (Hasan MUshrif) फारसे राजी नाहीत; पण त्याचवेळी आवाडे-पाटील यांचे कौटुंबिक संबंध आहेत, त्यातून पाटील यांना ‘स्वीकृत’च्या बदल्यात या गटातून थांबवले जाईल का? अशी चर्चा आहे.

कोरे यांनी तीन जागांची मागणी केली आहे. सध्या त्यांच्यासह सर्जेराव पेरीडकर बँकेत आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला सोबत घ्यावे असाही एक सूर आहे. तसे झाल्यास भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांना अनुसूचित जाती गटातून संधी मिळण्याची शक्यता आहे. माने हे कोरे यांचे नेतृत्त्व मानतात, त्यांना उमेदवारी देऊन कोरेंना तीन जागा दिल्याचे आणि भाजपला सोबत घेतल्याचा संदेश जाईल. या गटातील आमदार राजू आवळे यांच्यासाठी ताकद लावणारा कोण ‘गॉडफादर’ नाही ही या घडामोडींची दुसरी बाजू आहे.

गगनबावडा तालुक्यातून अर्जच न भरलेले संचालक पी. जी. शिंदे यांनी सौभाग्यवतींना रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेला दोन जागा द्यायचे झाल्यास माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांची या गटातील उमेदवारी निश्‍चित आहे; पण सौ. लतिका शिंदे यांना उमेदवारी द्यायची झाल्यास कोणाला थांबवणार हा प्रश्‍न आहे. प्रक्रिया गटातही बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांना कोरेंचा विरोध असला तरी त्यांनी मागितलेल्या तीन जागा देऊन हा विरोध कमी करण्याचा प्रयत्न राहील.

आबीटकरांची भूमिका महत्त्वाची

‘गोकुळ’मध्ये मुश्रीफ-सतेज पाटील यांच्यासोबत राहिलेले आमदार प्रकाश आबिटकर यांनी बंधू अर्जुन यांच्यासाठी पतसंस्था गटातून ताकद लावली आहे. या गटातील घडामोडी पाहता त्यांना उमेदवारी मिळेल का नाही याविषयी साशंकता आहे. या गटातून डावलल्यास पतसंस्थांसह राधानगरी, भुदरगड विकास संस्था गटातून त्यांच्याकडून उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आबिटकर यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ‘गोकुळ’मध्ये दोन जागा दिल्याच्या मुद्यावर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न राहील.

गुरुवारी बैठक शक्य

राखीव जागांवरील तोडगा काढण्यासाठी उद्या (ता. ७) होणारी बैठक रद्द झाली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे व डॉ. संजय डी. पाटील यांच्या मुलाचे लग्न उद्याच गोवा येथे आहे. त्यामुळे ही बैठक गुरुवारी (ता. ९) होण्याची शक्यता आहे. बैठकीला पालकमंत्री पाटील यांच्यासह मुश्रीफ, डॉ. कोरे, पी. एन., आवाडे आदींना बोलवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT