election.jpg 
कोल्हापूर

जिल्हा बॅंकांच्या निवडणुकांचे बिगुल सप्टेंबरमध्ये वाजणार?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव संकलनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : कोरोनाच्या (covid -19) पार्श्‍वभूमीवर गेल्या दीड वर्षात तब्बल सहा वेळा पुढे ढकललेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांवरील स्थगिती राज्य सरकारने उठवल्याने कोल्हापूर जिल्हा बँकेच्या (district bank election) निवडणुकीसाठी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव संकलनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून दोन दिवसांत बँकेच्या मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. (kolhapur news) या प्रारूप यादीवर हरकती मागवणे, त्यावरील सुनावणी व निकाल देणे हा कालावधी गृहित धरता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान शक्य आहे.

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालकांची मुदत मे २०२० मध्येच संपली आहे. तथापि त्याचवेळी राज्यात कोरोनाचा प्रसार वाढल्याने जिल्हा बँकांसह सर्वच सहकारी संस्थांच्या (co-operative societies) निवडणुकांना सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर वेळोवेळी निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. ६ एप्रिल २०२१ ला शासनाने उच्च न्यायालयाने (high court) निर्णय दिलेल्या संस्था वगळून जिल्हा बँकेसह राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलल्या होत्या.

राज्यातील बहुंताशी जिल्हा बँकांच्या विद्यमान संचालकांच्या कार्यकाल संपला आहे. पाच वर्षांची संचालकांची मुदत संपूनही जवळपास १५ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ही बाब विचारात घेऊन शासनाने आज केवळ जिल्हा बँकांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवली. ही प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी मतदारयाद्यांचा कार्यक्रम तातडीने सुरू करावा असे आदेशात म्हटले आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेची ठराव प्रक्रिया फेब्रुवारी २०२१ मध्येच पर्ण झाली आहे. बँकेच्या एकूण ११ हजार ४४८ सभासद संस्था आहेत. यापैकी ८ हजार ५०० संस्थांचे ठराव दाखल झाले होते. यापैकी ७ हजार १७७ संस्थांचे ठराव ३१ जानेवारी २०२० पर्यंत तर १५ ते २२ फेब्रुवारी या काळात १३२३ संस्थांचे ठराव दाखल झाले आहेत. ठराव दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर या निवडणुकांना स्थगिती दण्यात आली. त्यामुळे आता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवण्याची प्रक्रिया दोन दिवसांत सुरू होईल.

दृष्टिक्षेपात ठराव संख्या

गट क्रमांक गटाचे नांव एकूण संस्था ठराव आलेल्या संस्था

  • विकास सेवा गट १९४१ १९०५

  • खरेदी विक्री संस्था ६७७ ५४७

  • नागरी पतसंस्था, इतर २३९७ १४०३

  • पाणी पुरवठ्यासह इतर ६४३३ ४६४५

  • एकूण ११,४४८ ८५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT