District Sports Officer Dr. Chandrasekhar Sakhare esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : जिल्हा क्रीडाधिकारी साखरे 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; ठेकेदाराकडून घेतली एक लाख दहा हजारांची 'लाच'

कामाच्या १५ टक्के दराने लाच म्हणून एक लाख २७ हजार ९५० रुपयांची मागणी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वर्षात एक जानेवारीपासून आजअखेर एकूण १७ ठिकाणी छापे टाकून संबंधितांना अटक केली आहे.

कोल्हापूर : येथील जिल्हा क्रीडाधिकारी (District Sports Officer) डॉ. चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (वर्ग एक) याला एक लाख दहा हजारांची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

ठेकेदाराचे बिल मंजुरीपोटी पंधरा टक्के म्हणून एक लाख दहा हजारांची लाच घेताना सायंकाळी कारवाई झाली, अशी माहिती विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली. कारवाईसंदर्भात श्री. नाळे यांनी दिलेली माहिती अशी : साखरे (वय ५२, रा. आई निवास १५६/२, फ्लॅट क्रमांक ५, राजगृह हौसिंग सोसायटी, वृंदावन व्हिला शेजारी विश्रामबाग, सांगली) मूळचा सांगलीचा (Sangli) आहे.

त्यामुळे पथकाकडून त्याच्या विश्रामबागमधील घराची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकरणातील तक्रारदार पुण्याचे व व्यवसायाने ठेकेदार आहेत. त्यांनी ऑनलाईन महानिविदेद्वारे अॅल्युमिनियम कंपोझिट पॅनेलवर ‘प्रिन्टशिट’ तयार करून देण्याची निविदा भरली होती. हे काम त्यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी अॅल्युमिनियम कंपोझिट पॅनेलवर प्रिन्टशिट तयार करण्यासाठी सर्व साहित्याचा पुरवठा केला होता.

त्याचे एकूण बिल आठ लाख ८९ हजार २०० रुपये झाले. काम पूर्ण करून दोन महिने झाले तरीही बिल मंजूर करण्यासाठी टाळाटाळ होऊ लागली. त्यामुळे तक्रारदाराने शिवाजी स्टेडियम येथील साखरेच्या कार्यालयात येऊन याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने तक्रारदाराकडे एकूण निविदा कामाच्या १५ टक्के दराने लाच म्हणून एक लाख २७ हजार ९५० रुपयांची मागणी केली होती.

याबाबत त्यांनी साखरेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितली तसेच तडजोडीअंती एक लाख १० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आज सापळा रचून त्याला साक्षीदारांच्या समक्ष पकडून अटक केली. नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंके, उपनिरीक्षक संजीव बंदरगेकर, हेडकॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, सचिन पाटील, मयूर देसाई, संदीप पवार, रुपेश माने, विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.

आजअखेर १७ ठिकाणी कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वर्षात एक जानेवारीपासून आजअखेर एकूण १७ ठिकाणी छापे टाकून संबंधितांना अटक केली आहे. यामध्ये साखरेसह वर्ग एकचे तीन अधिकारी आहेत. साखरे २०११ ते १४ दरम्यान बीड तर २०१४ ते २०१८ मध्ये परभणीमध्ये नोकरीस होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याची बदली कोल्हापुरात झाली. तो आजपर्यंत येथे आहे, असेही उपअधीक्षक नाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT