do not follow the role of social distance in laxmipuri market kolhapur
do not follow the role of social distance in laxmipuri market kolhapur 
कोल्हापूर

कसले सोशल डिस्टन्स अन् कसले काय...? कोल्हापुरकर नियम पाळा जरा...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनापासून एकेक रुग्ण वाचविण्यासाठी एका बाजूला धडपड सुरू असताना दूसरीकडे भाजी मंडईच्या निमित्ताने गर्दीचे केंद्र बनलेली लक्ष्मीपुरीच परिसर अधिक धोकादायक ठरू शकतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळपासून सोशल डिस्टनिंगचे नियम धाब्यावर बसवून रिलाएन्स मॉल समोरच्या रस्त्याला अक्षरक्षः जत्रेचे स्वरूप आले. अन्य ठिकाणी रस्त्यावर मंडई वसली आहे. तेथेही अशीच अवस्था होती.गर्दीची ठिकाणे ही कोरोनाची प्रमूख केंद्रे असल्याची सांगितले जाते. गर्दी करू नका असे सांगून शासकीय यंत्रणा आता थकली आहे.

लोक ऐकतच नाहीत त्याला करायचे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मध्यंतरी प्रत्येक विक्रेत्यांने किमान तीस फूटांच्या अंतरावर बसावे अशी अट घालण्यात आली. ती अट झुगारून पुन्हा मंडई भरली. महापालिकेने पुन्हा मंडई उठविली. आंब्याचा सिझन सुरू झाला आहे तशी लक्ष्मीपुरीतील गर्दीत वाढ झाली आहे. पारंपारिक रस्त्यावर मिरची. मसाल्याच्या व्यापाऱ्यांसह अन्य विक्रेते आहेत पण मुख्य रस्त्यावर आंबा विक्रेत्यासह कांदा, बटाटा विकणाऱ्यांची गदी होऊ लागली आहे. सोबतीला भाजीपाला आहे.
सायंकाळी पाचपर्यत मंडई चालत असल्याने सकाळी सातपासूनच येथे जागा पकडण्यासठी गदी सुरू होते. मोक्‍याची जागा तुला मिळते की मला यावरून धावाधाव सुरू होते. आज सकाळी नऊपासूनच शहरवासियांचे पाय मंडईकडे वळू लागले. मूळात लांब गाडी लावून भाजी खरेदीची कुणाची मानसिकता नसते. त्यामुळे गाडी थेट रस्त्यावर आणि गाडीचा मालक भाजी खरेदीसाठी विकेत्याकडे असे चित्र निर्माण झाली. दुपारी बारापयॅत एखाद्या नियमित मंडई गर्दी होणार नाही इतकी गदी या मंडईत झाली. महापालिका कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत सर्वकाही सुरू होते. बंदोबस्तावर असलेले पोलिसही हतबल झाले होते.

मंडई वसण्यास विक्री करण्यास कुणाची हरकत नाही. शेवटी भाजीपाला विक्रेतेही हातावरचे पोट असणारी मंडळी आहेत. लॉकडाऊनमुळे साध्या किराणा दुकानदारांनी शिस्त लावून घेतली आहे. रेशन धान्य दुकान, औषध विक्रेते यांनी सोशल डिस्टन्ससाठी खडूने मार्किग केले आहे. लक्ष्मीपुरीसह शहरात ज्या ज्या ठिकाणी मंडई वसते तेथे मात्र नियम पाळले जात नाही. एका बाजूला व्यापार उद्योग बंद असताना दूसऱ्या बाजूला मंडई पर्यायी गर्दीच्या रूपाने नवे संकट उभे राहत आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT