कोल्हापूर ः डॉक्टर साहेब, आम्हाला काय होईल काय? असे प्रश्न आता सर्वस्तरांतून, वयोगटातून मानसोपचार तज्ज्ञांकडे येऊ लागले आहेत. कोरोना विषाणूने पॉझिटिव्ह असलेल्यांची आकडेवारी वाढत जाईल, तशी लोकांमध्ये भीती अधिक गडद होत आहे. त्यातूनच अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. त्यांच्याकडून उपचार घ्यावे लागत आहेत. याबाबत मानसोपचार तज्ज्ञांशी आम्ही संवाद साधला आणि त्यातून अनेक पदर उलगडले.
कोरोनामुळे लोकांमध्ये भीती वाढली आहे. थेट संपर्क नसला तरीही आजूबाजूच्या परिस्थितीमुळे नागरिक घाबरत आहेत. गल्लीत, अपार्टमेंटमध्ये एखादा रुग्ण सापडल्यास इतर सर्व जणांना भीती वाटू लागते. यात डॉक्टरासह पोलिस आणि इतर घटकही आहेत. भीतीचे कारण म्हणजे त्यांना आपल्यालाच धोका असल्याची भावना होत आहे. त्यातून त्यांच्या मनावर दडपण येत असल्याचेही पुढे आले आहे.
भीतीची प्रमुख कारणे
- नोकरीवरून कमी करणे
- आर्थिक बॅलन्स नसणे
- कर्जाचे हप्त्यांची काळजी (गाडी, बंगला व इतर)
- नोकरी व व्यवसायातील अनिश्चितता
- भविष्याची काळजी
- सामाजिक पत धोक्यात येणे, प्रतिष्ठेची काळजी वाटणे
ठळक मुद्दे
वयोगट ः मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणारा वयोगट 20 ते 55 पर्यंतचा
कारण ः आम्हाला कोरोना होईल का हीच भीती
वर्ग ः डॉक्टर, पोलिस आणि इतर अधिकारी
डॉक्टरांकडे का जातात ः थेट संपर्क नसला तरीही भीतीने विचारणा
डॉक्टरांचा सल्ला कोण जादा घेते ः कोरोना महामारीत काम करणाऱ्यांकडून अधिक विचारणा
मानसिक समाधान राखण्यासाठी काय करावे?
- पॉझिटिव्ह विचार करावे
- मी कोणाच्या संपर्कात नाही, मला काही होणार नाही, असे विचार करा
- स्वतः मास्क वापरा, इतरांना वापरण्यास भाग पाडा
- बोलतानाही मास्क काढून बोलू नका, यातून दोघांना ही धोका होतो, हे पटवून द्या
- सोशल डिस्टन्स स्वतःहून पाळण्यास पुढे व्हा
- लहान आणि वृद्धांनी घरातून बाहेर पडूच नका, भीती वाटणार नाही
-----------------
म्हणून मानसिकता बिघडत आहे?
- रोज वाढत जाणारी रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी
- रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत म्हणून
- लस किंवा औषध नसल्याने भीती बळावली
- प्रशासनाकडून उपाय तोकडे असल्याने
- समस्या अधिक गडद होत असल्याने
- भीतीचे वातावरण निर्माण होत आहे म्हणून
- मास्क, सोशल डिस्टन्सचे नियम न पाळत असल्याच्या भीतीने
सध्या मानसिक स्थिती बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. अजून कम्युनिटी स्प्रेड नाही. तरीही भीतीचे वातावरण वाढले आहे. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल चौपट झाली. यात डॉक्टरांचाही समावेश आहे. घाबरणाऱ्या व्यक्ती, पोलिस, कोरोना महामारीत थेट काम करणाऱ्या व्यक्तींची भीती अधिक वाढली आहे. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या, संपर्क साधणाऱ्यांची संख्या चौपट झाली.
- डॉ. पी. एम. चौगुले, मनोविकार तज्ज्ञ
- संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.