dogs group attacked and killed the farmer crime marathi news kurundwad 
कोल्हापूर

कोल्हापुरात कुत्र्यांची दहशत : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू ; दोन महिन्यात घेतले दोन बळी

अनिल केरीपाळे

कुरुंदवाड(कोल्हापूर) :  गेल्या महिन्यापासून कोल्हापुरात कुत्र्यांनी चांगलीच दहशत माजवली आहे. गेल्या महिन्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा नाहक बळी गेला होता. त्यानंतर आज एका आणखी शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला आहे. नवे दानवाड ता. शिरोळ येथील शेतकरी आप्पासो बाबु अंबूपे (वय ५९) याचा कुत्र्याच्या टोळीने हल्ला करुन बळी घेतला.आज दुपारी दत्तवाड दानवाडनजीक दावलमलिक पट्टीत ही घटना घडली.

गेल्याच महिन्यात याच परीसरात एका शेतमजूर महिलेवर कुत्र्यांनी हल्ला करुन बळी घेतला होता. त्यामुळे कुत्र्याची चांगलीच दहशत पसरली असून या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान गेल्या महिन्यात महिलेच्या मृत्तुनंतरही या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात न आल्याने या शेतकर्‍यांचा हकनाक बळी गेला आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, 
आज बार‍ा वाजण्याच्या सुमारास आप्पासो अंबुपे दानवाड दत्तवाड मार्गावरील दावलमलिक पट्टी येथे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते.  साधारणतः दोनच्या सुमारास शेतातून किंचाळण्याचा व आरडाओरडा करण्याचा आवाज ऐकू आला त्यानंतर कुत्र्यांच्याही भुंकण्याचा आवाज ऐकू आला. त्याभागात शेतात आलेल्या शेतकर्‍यांना चार ते पाच मोठमोठया कुत्र्यांचे तोंड रक्ताने माखलेले दिसले व एका व्यक्तीचा कन्हण्याचा आवाजही आला. त्या शेतकर्‍यांनी कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र उलट ही कुत्रीच अंगावर येवू लागली त्यामुळे शेतकरी घाबरेघुबरे झाले. 


थोड्या वेळाने आप्पासो अंबुपे यांच्यावर कुत्र्यानी हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. एखाद्या हिंस्र प्राण्याप्रमाणे या कुत्र्यांनी अंबुपे यांना ओरबडून काढले होते. रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती त्यांच्या नातेवाइकांना व पोलिसांना कळविण्यात आली. पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. मयत अंबुपे यांची दोन एकर शेती असून त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा व दोन मुली असा परीवार आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने घेतला गळफास

Ranji Trophy: जैस्वालचे अर्धशतक, मुशीर खानही लढला; पण मुंबईचा संघ पहिल्याच दिवशी गडगडला

Georai News : फार्मर आयडी नसल्याने अडकले गेवराईतील सोळा हजार शेतक-यांचे अतिवृष्टीचे अनुदान; सवा लाख शेतक-यांचे झाले होते नुकसान

Georai Crime : धुमेगाव शिवारात दोनशे किलोची गांजाची झाडे जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

SCROLL FOR NEXT