kolhapur cpr hospital sakal
कोल्हापूर

सीपीआर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज; अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित

गंभीर बाधितांवर होणार उपचार; अद्ययावत ५५० बेड

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘‘तिसऱ्या लाटेत सीपीआरमध्ये फक्त गंभीर कोरोनाबाधित तसेच कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर उपचार होणार आहेत. त्यासाठी ५५० बेडसह नव्या तांत्रिक सुविधा उपलब्ध आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बालरोग उपचारापासून ते महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील सुविधांचा लाभ देण्याचे नियोजन केल्याची माहिती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकताच सीपीआरचा केलेला पंचनामा, ‘सकाळ’मधून उणिवांवर ठेवलेले बोट या पाश्वर्भूमीवर नव्या सुधारणांची माहिती देण्यासाठी डॉ. दीक्षित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे उपस्थित होते.

डॉ. दीक्षित म्हणाले, ‘‘लसीकरणामुळे कोरोनाची तीव्रता कमी आहे. ५ ते ७ टक्के रुग्णांना ॲडमीटची गरज भासते. तीव्र बाधित व कोरोना व्यतिरिक्त अन्य रुग्णांवर उपचारासाठी बेड शिल्लक असावेत म्हणून सौम्य लक्षणांच्या बाधितांनी त्या त्या कोविड सेंटरमध्येच दाखल व्हावे. गरज पडली तरच सीपीआरमध्ये यावे. डायलेलीस सुविधा क्षमतेने सुरू आहे. यात एचआयव्ही किंवा काविळचे हिपॅटाईटस बीचे रुग्णांचे डायलेसिस सीपीआरमध्ये होईल याची काळजी घेतली जात आहे. १० बेड आहेत यातील दोन बेड एचआयव्ही रुग्णासाठी वापरले जातील त्याचा स्वतंत्र कक्ष करण्यात येत आहे. नवीन तीन तंत्रज्ञ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष आहे. आठवडाभरात १२०० दाखले दिले. काही त्रुटींमुळे प्रलंबित आहेत. यात २ हजार दिव्यांग जास्त नोंदले आहेत. त्यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर दिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांनी दोन डॉक्टर दिल्यामुळे दिव्यांग दाखल्याचे प्रलंबित काम पंधरा दिवसांत उरकले जाईल.’’

या नव्या सुविधा

  1. इंटरनेट कॉलिंग सिस्टीम बसविणार

  2. एचएमआय सिस्टीमद्वारे रुग्ण नोंदणी

  3. उपचाराची इथ्यंभूत माहिती

  4. इंटरकॉम कॉलिंग सिस्टिमची सोय

  5. गरम पाण्यासाठी सौरऊर्जा सिस्‍टीम

  6. शेंडापार्क येथे दोन क्लोड रूम

निम्मे व्हेंटिलेटर बंद

पंतप्रधान योजनेतून आलेली ५० टक्के व्हेंटिलेटर सुरू आहेत. काही तांत्रिक दोषामुळे वापरात नाहीत. काही पूर्ण खराब झाले आहेत. त्याच्यावर समिती नियुक्ती करून १६ व्हेंटिलेटर खराब असल्याने ते बाजूला काढले. १५ दुरुस्त केले आहेत.

दृष्टिक्षेपात सीपीआर

  1. तिन्ही ऑॅक्सिजन प्लँट कार्यान्वित

  2. १६० बेड ऑक्सिजनयुक्त

  3. ५५० बेडपैकी ११० बेड कोरोनासाठी

  4. ३४ बेड आयसीयु; ३० बेड शिल्लक

  5. बालरोग विभागात २० आयसीयू बेडसह ६० बेड

  6. कोयना इमारतीत तळमजल्यावर लसीकरण सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT