demanded ransom 
कोल्हापूर

50 हजार खंडणी द्या अन्यथा वंशाचा दिवा पुसून टाकतो...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - दुकानात चिठ्ठी टाकून दरमहा 50 हजार रुपये द्यायची व्यवस्था करायची नाही तर वंशाचा दिवा पुसून टाकला जाईल... अशी धमकीची चिठ्ठी दुकानात टाकून खंडणीची मागणी करण्याचा प्रकार अज्ञाताने केला. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद युवराज रमेश सोनवणे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती, युवराज सोनवणे यांचे जवाहरनगरात वडीलोपार्जित दुकान आहे. दुकानाचा व्यवहार त्यांची बहीण पाहते. त्यांनी बुधवारी (ता. 3) सायंकाळी सात नंतर दुकान बंद केले. हे दुकान दुसऱ्या दिवशी (ता.4) सकाळी दहाच्या सुमारास उघडले. त्यावेळी दुकानात सोनवणे यांना चिठ्ठी सापडली. त्यात दर महिन्याला 50 हजार रुपये खंडणीची मागणी व वंशाचा दिवा पुसण्यासह जीवे मारण्याचा मजकूर नमुद केला होता. याची माहिती सोनवणे यांनी राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी संबधित चिठ्ठी ताब्यातघेऊन त्याआधारे संबंधित खंडणीबहाद्दराचा शोध सुरू केला. त्यासाठी परिसरातील सीसी टीव्हीही तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Copper Theft: लोणी काळभोरमध्ये महावितरणच्या ६३० केव्हीए रोहित्रातील ४०० किलो तांब्याची चोरी; १.८० लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime: चांगल्या शाळेत घालतो सांगून १४ वर्षीय मुलीला मुंबईत आणलं, नराधम नातेवाइकानंच मुलीला वेश्याव्यवसायात अडकवलं

Pali Bypoll: पाली नगरपंचायत पोटनिवडणूक : प्रभाग 13 मध्ये 85.30 टक्के विक्रमी मतदान, महायुतीतील बिघाडीमुळे हायव्होल्टेज लढत

Latest Marathi Live Updates: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पोहोचले

Thane News: ठाणेकरांचे पाणी डेटा सेंटरच्या घशात! राष्ट्रवादीचा आरोप; अ‍ॅमेझॉनच्या प्रस्तावित प्रकल्पावरून वादंग

SCROLL FOR NEXT