due to rain in kolhapur day today life disturb in kolhapur on evening 
कोल्हापूर

कोल्हापुरात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजाप्रमाणे शहरासह जिल्ह्यात दुपारी जोरदार पाऊस सुरू झाला आहे. अचानक सुरु मेघगर्जनेसह सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांना पळता भुई थोडी झाली. अनेकांनी गाड्यांवर चटई प्लास्टिकचे कागद झाकले. 
अचानक सुरू झालेल्या पावसामुळे महाद्वार रोडवर एकही ग्राहक दिसत नव्हता. 

कोल्हापूर शहर जिल्ह्यांमध्ये आज पासून चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. त्यानुसार आज दुपारी चारच्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे वाहनधारकांची आणि ग्राहकांची धांदल उडाली. ऑक्टोबर महिन्यात उन्हाळा प्रचंड असल्याने उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोळ्यावर गॉगल आणि डोक्यावर टोपी घातलेले चित्र दिवसभरात दिसत होते. मात्र दुपारी चार वाजता आलेल्या पावसाच्या  जोरदार सरींसह  विजांच्या कडकडाटामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. अनेक वाहनधारक आणि ग्राहकांना मिळेल त्या ठिकाणी आसरा घेऊन पावसापासून संरक्षण करावे लागले. 

आज शनिवार असल्याने महाद्वार रोडवर ग्राहकांची गर्दी होती. मात्र दुपारी चारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने फेरीवाल्यांसह ग्राहकांमध्ये गडबड उडाली. फेरीवाल्यांच्या गाडीवर असलेले साहित्यही त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे अनेकांनी गाड्यावर तत्ती प्लास्टिक कागद छत्र्या ठेवून पावसापासून साहित्याचा बचाव केला. विजांचा कडकडाट होत असल्यामुळे दहा पंधरा मिनिटातच महाद्वार शांत शांत झाला. पाहता पाहता महाद्वार वर एकही ग्राहक दिसत नव्हता.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fool Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो एप्रिल फूल्स डे? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

Ahilyanagar Murder Case: खूनप्रकरणी बापलेकाला शिक्षा; अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल, एकास सक्तमजुरी!

हीच तर खरी संस्कृती! प्रियांका चोप्राने सुवर्ण मंदिरात जमिनीवर बसून सगळ्यांसोबत घासली भांडी, देसी गर्लच्या सेवेचं कौतूक, Viral Video

SCROLL FOR NEXT