Due To Rains In Ajara Taluka Damage To Rice, Peanuts Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

भात लागले तरंगू, भुईमूगाला आले कोंब

रणजित कालेकर

आजरा : आजरा तालुक्‍यात परतीच्या पावसाचा दणका सुरुच आहे. तालुक्‍यात बारा तासात सरासरी 56.6 मिमी पाऊस झाला. उतूरमध्ये तर काल सोमवार (ता.26) मध्यरात्री कोसळलेल्या पावसाने चांगलीच दैना उडवली. सहा तासात ढग फुटीसदृश्‍य 113 मिली मिटर पाऊस झाला. दरम्यान, पावसामुळे भात कापणी व भुईमुग काढणी ठप्प झाली असून शेतात कापून ठेवलेल्या भाताच्या कोवळ्या शेतवडीत साचलेल्या पाण्यात तरंगत आहेत. तालुक्‍यात भात कापणी पन्नास टक्के झाली असून उर्वरीत सुगी अडचणीत आली आहे. 

तालुक्‍यात भुईमुग काढणीचे काम वेगाने सुरु आहे, पण पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने भुईमूग काढणीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे शेंगांना कोंब उगवले आहेत. शेंगा वाळवण्यात उन्हाची अडचण असल्याने शेंगाना भुरी येवू लागली आहे. 

धुळवाफ व कुरीची कापणी अंतिम टप्प्यात आहेत. रोपलावणीच्या भात कापणीला सुरवात झाली आहे, पण तालुक्‍यात परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार माजवला आहे. त्यामुळे भात कापणी, मळणीची कामे अडचणीत आली आहेत. सकाळी उन्हं पडले, तर संध्याकाळी पावसाला सुरवात होते. त्यामुळे सुगीची कामे कशी उरकावयाची हा शेतकऱ्यांसमोर प्रश्‍न आहे.

गेले आठ दिवस तालुक्‍यात परतीचा पाऊस जोरात सुरू आहे. निम गरवी भाते कापणीला आली असून पावसाच्या माऱ्याने दाणे गळून पडत आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे कापलेल्या भाताच्या कोवळ्या पाण्यावर तरंगत आहेत. त्याचबरोबर गवत ही भिजले असून जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे. 

पंचनाम्याला सुरवात 
तालुक्‍यात पावसाने भात, भूईमुग व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून 98 गावात पिकांच्या पंचनाम्याला सुरवात झाली आहे. तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक पंचनाम्याच्या कामात व्यस्त आहेत. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

Crime: तरुणीनं प्रियकराला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला; प्रेयसीला राग अनावर, क्रीडांगणात गाठलं अन्..., काय घडलं?

Dharashiv Agriculture : येरमाळ्याच्या तरुण शेतकऱ्याची कमाल; घरच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून इराक निर्यातीत यश!

Motor Vehicle Rules: दहा वर्षांची गाडी समजणार जुनी; 'फिटनेस फी' दहा पटींपर्यंत वाढली, केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा!

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

SCROLL FOR NEXT