during corona the election of gram panchayat delayed and the CEO of zilla parishad appoint administrator on 41 gram panchayat in panhala 
कोल्हापूर

कोरोनाचा परिणाम ; पन्हाळा तालुक्यात 41 ग्रामपंचायतीवर प्रशासक

सकाळ वृत्तसेवा

आपटी : पन्हाळा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायती मुदत ३१ ऑगस्ट २०२० अखेर संपत आहे. पण या ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या ग्रा. पं. सदस्यांचा कायद्याने कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे येथील कामकाज चालवण्यासाठी प्रशासकांच्या नियुक्तीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी पन्हाळा गटविकास अधिकारी तुलसीदास शिंदेंना आदेश दिले आहेत.

पन्हाळा तालुक्यातील २५ ऑगस्टला १, ३० ऑगस्टला १९ तर ३१ ऑगस्टला २१ अशा ४१ ग्रामपंचायती मुदत संपत आहे. राज्यभरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठया प्रमाणात झाल्याने या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर शासनाच्या 
ग्रामविकास विभागाने प्रशासक नेमण्याचा निर्णत घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १५१ मधील पोट कलम १ मध्ये खंड (क) मधील तरतुदी नुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने १३ जुलै २०२० रोजी घेतलेल्या निर्णयान्वये प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

त्या नुसार पन्हाळा तालुक्यातील ३१ ऑगस्ट २०२० अखेर मुदत संपलेल्या ४१ ग्रामपंचायतीवर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी प्रशासकांच्या नियुक्त्यांचे आदेश दिले. त्यानुसार २६ ऑगस्टला १, ३१ ऑगस्टला १९ तर १ सप्टेंबरला २१ ठिकाणी प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. पन्हाळा तालुक्यातील प्रशासक नियुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची यादी खालील प्रमाणे पन्हाळा तालुक्यातील जाफळे ग्राम पंचायतीवर  २६ ऑगस्ट रोजी प्रशासक म्हणून एन. के. पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
    

पन्हाळा तालुक्यातील ३१ ऑगस्ट रोजी प्रशासकाची नियुक्ती होणाऱ्या ग्रा. पंचायतींची यादी अनुक्रमे गाव प्रशासकाचे नाव

१)माजनाळ-विलास शंकर तराळ, २)धबधबेवाडी-विजय केशव दाभोळकर, ३)सोमवारपेठ-रविकांत यशवंत पाटील, ४)बुधवार पेठ-प्रकाश शामराव सूर्यवंशी, ५)नावली-मनीषा राजाराम धनवडे, ६)इंजोळे इतेखाब मुनताज आगा, ७)आवळी-नावली-मनीषा राजाराम धनवडे, ८)नणूद्रे-इतेखाब मुनताज आगा, ९)कणेरी-सुनंदा शी.कोष्टी, १०)केखले- प्रवीण शहाजी चव्हाण, ११)दिगवडे-ज्योती रुपेशकुमार कांबळे, १२)उंड्री-संजय पांडुरंग देसाई, १३)वारनुळ-उत्तम वसंत लोखंडे, १४)पोर्ले/ठाणे-बाळासाहेब विष्णू कदम, १५)कसबा कोडोली-राजेंद्र महादेव तळपे, १६)कळे-पांडुरंग दत्तात्रय भोसले, १७)पैजारवाडी- प्रवीण शहाजी चव्हाण, १८)जेऊर-मेघा मोहन माळी, १९)आरळे-संजय तुकाराम काटकर.

१ सप्टेंबर रोजी प्रशासकाची नियुक्ती होणाऱ्या ग्रा. पंचायतींची यादी अनुक्रमे गाव प्रशासकाचे नाव 

१)पोहाळे/बोरगाव-पांडुरंग दत्तात्रय भोसले, २)पुनाळ-विलास शंकर तराळ, ३)आंबर्डे-रेखा सुभाष ओतारी, ४)सातार्डे-वैशाली तुकाराम सामंत, ५)हरपवडे-उत्तम वसंत लोखंडे, ६)निवडे-रविकांत यशवंत पाटील, ७)म्हाळुंगे/बोरगाव-सुशील पांडुरंग मर्दाने, ८)नेबापूर-रशिदा याकूब अत्तार, ९)पोखले-संजय तुकाराम काटकर, १०)वाघवे-बाळासाहेब विष्णू कदम, ११)तिरपण-प्रवीण अशोक राव, १२)पोहाळवाडी-रंगराव दत्तू पाटील, १३)पुशिरे/बोरगाव-रंगराव दत्तू पाटील, १४)तेलवे-प्रवीण अशोक राव, १५)निकमवाडी-राखीया बा मौलासो मुलाणी, १६)उत्रे-विजय केशव दाभोळकर, १७)सावर्डे/सातवे-आरुनकुमार शंकर बिडवे, १८)मोहरे-राजेंद्र महादेव तळपे, १९)कसबा सातवे-संजय पांडुरंग देसाई, २०)देवाळे--आरुनकुमार शंकर बिडवे, २१)आपटी-प्रकाश शामराव सूर्यवंशी

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT