East Bengal's Entry In The Indian Super League Is Possible Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इंडियन सुपर लिगमध्ये ईस्ट बंगालची एट्री शक्‍य, वाचा काय आहे फुटबॉलची बातमी

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : फुटबॉल स्पोटस्‌ डेव्हलपमेंन्ट इंडिया लिमिटेडने (एफएसडीएल) इंडियन सुपर लिगसाठी (आयएसएल) नव्या संघाच्या शाधार्थ निविदा काढली आहे. त्यासाठी सतरा सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. यात दिल्ली, लुढियाना, कोलकत्ता, अहमदाबाद, भोपाळ, सिलुगडी येथील फुटबॉल संघाना निविदा भरता येतील. नोव्हेंबरपासून गोव्यात कोरोनामुळे बंद दरवाज्याआड होणाऱ्या या स्पर्धेच्या सातव्या हंगामात या नव्या संघाला प्रवेश मिळणार. यामध्ये कोलकत्ताच्या मातबर ईस्ट बंगालची वर्णी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या निर्णयाकडे भारतीय फुटबॉल विश्‍वाचे लक्ष लागून राहिले आहे. 

आयपीएलच्या यशाचा आदर्श घेऊन देशातील बहुतांशी राष्ट्रीय क्रीडा संघटनांनी त्याच धर्तीवर स्पर्धा सुरू केल्या. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) देखील सहा वर्षापूर्वी आयएसएल स्पर्धेचा श्रीगणेशा केला. रिलायन्स उद्योगसमुहाच्या पुढाकाराने एफएसडीएल ही संस्था या स्पर्धेचे निंयत्रण करते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रेक्षपण, करोडो रूपयांची पारितोषिके, युरोप व आफ्रिकेतील नामवंत फुटबालपटूंचा सहभाग यामुळे ही स्पर्धा अल्पावधीत लोकप्रिय ठरली. गतवर्षी एआयएफएफने जुन्या इडियन फुटबॉल लिगला (आय लिग) मागे सारुन आयएसएलला भारतीय फुटबॅलमधील अव्वल स्पर्धेचा दर्जा बहाल केला. 

सध्या या स्पर्धेत ऐटिके मोहन बागान, एफसी गोवा, बंगळुरू एफसी, चेन्नईन एफसी, जमशेदपूर एफसी, ओडासा एफसी, हैद्राबाद एफसी, केरला ब्लास्टर्स, नॅर्थ ईस्ट युनायटेड, मुंबई सिटी एफसी असे दहा संघ आहेत. यात आता आणखी एका संघाची भर पडणार आहे. या पार्श्‍वभुमीवर दोन महिन्यावर आलेल्या स्पर्धेसाठी संघाची बांधणी सुरू झाली आहे. खासकरुन प्रशिक्षक, परदेशी खेळाडू यांना करारबध्द करण्यासाठी चढाआढ सुरू आहे. कोलकत्याचा एटिके हा स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्टीक साकारणारा सर्वाधिक यशस्वी संघ आहे. यावर्षी तब्बल सात संघानी स्पेनच्या प्रशिक्षकांना पसंती दिली आहे. 

चाहत्यांचा दबाव 
फुटबॉल वेड्या बंगालमधील शतकाहुनही अधिक गौरवशाली इतिहास मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या कट्टरप्रतिस्पर्धी संघाना आहे. लाखो चाहते असणाऱ्या या दोन संघातील लढत "कोलकत्ता डर्बी' जागतिक फुटबॉलमध्येही लक्षवेधी मानली जाते. गतवर्षी एटीके संघाने मोहन बागान संघाचे शेअर्स खरेदी केल्याने हे दोन्हीं संघाचे एकत्रिकरण झाले. साहजिकच ईस्ट बंगाल संघानेही आयएसएलमध्ये उतरावे असा चाहत्यांचा दबाव आहे. लाखों चाहत्याची संख्या लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणूकावर नजर ठेवुन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पाठबळ देण्याचा निर्णय घेतल्याने ईस्ट बंगालच्या आशा बळावल्या आहेत. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : हवामान विभाकडून पावसाचा ग्रीन अलर्ट, पण...; आणखी किती दिवस राहणार रिपरिप?

पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर रात्री दीडलाच का केला हल्ला? CDS चौहानांचा 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठा खुलासा; म्हणाले, 'पहिली अजान...'

MLA Bachchu Kadu: अन्यथा भाजपचा बॅलेट कोरा करणार: आमदार बच्चू कडू; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाच काय झालं

Latest Marathi News Updates : स्टॉक ट्रेडिंग घोटाळ्यात ३७.८ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

SCROLL FOR NEXT