Ebike craze in Kolhapur 25 bikes sold daily in the city veichal marathi news 
कोल्हापूर

‘ई-बाइक’ची कोल्हापुरात  क्रेझ ; शहरात दररोज २५ दुचाकींची विक्री

मतीन शेख

कोल्हापूर: इंधनाचे दर वाढत आहेत. पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांपर्यंत पोचले आहे. भविष्यातही वाढ होत राहण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमीवर पेट्रोल बाइकला पर्याय म्हणून नागरिक ई-बाइक खरेदीला पसंती देत आहेत. शहरात महिनाभरापासून सरासरी दररोज २५ इलेक्‍ट्रॉनिक्‍स बाइकची विक्री होत आहे.

केएमटी बससेवेव्यतिरिक्त शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुसरी व्यवस्था नसल्याने रिक्षा, वडाप यावरच प्रवास अवलंबून असतो; मात्र रिक्षाचे भाडेही पडवडत नसल्याने तसेच पेट्रोल बाइक चालवणे ही खर्चिक बाब झाल्याने ई-बाइक खरेदीकडे कल वाढला आहे.

२२ ई-बाइक्‍सचे शोरूम असून, एका शोरूममधून रोज दोन ते तीन ई-बाइक्‍स विकल्या जात आहेत. ७२ व्होल्टपर्यंत इंजिन क्षमता असणाऱ्या गाड्यांना आरटीओ अगर इतर नोंदणीची गरज नाही. गाडीचा वेग ५० किमी. प्रती तासाच्या पुढे जात नसल्याने या वाहनधारकांना लायसन्सची गरज पडत नाही. त्यामुळेही लोकांना ही बाइक फायद्याची ठरत आहे. 

ई-बाइकची वैशिष्ट्ये
  पेट्रोलऐवजी बॅटरी चार्जिंगवर धावणार
  बॅटरीच्या क्षमतेनुसार ५० ते ८० किमीपर्यंत धाव
  बॅटरी चार्जिंगसाठी कमीत कमी खर्च
  आरटीओ नोंदणी, परवाना, प्लग, कार्बोरेटर, इंजिन ऑईलची गरज नाही
  प्रदूषणमुक्त, आवाजविरहित गाडी 


ई-बाइक ही संकल्पना कोल्हापुरात अजून रुजली नसली तरी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. दोन महिन्यांत विक्री चांगली होत आहे.
- धनंजय सरनोबत, महालक्ष्मी इलेक्‍ट्रोव्हेज

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT