EFCO organization in kolhapur to provide our account holder 20 percent dividend till 19 years
EFCO organization in kolhapur to provide our account holder 20 percent dividend till 19 years 
कोल्हापूर

इफको संस्थेच्या सभासद संस्थांसाठी खुशखबर ; खात्यामध्ये होणार 20 टक्के डिव्हीडंड जमा

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : इंडियन फारमर्स  फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफको या संस्थेमार्फत यावर्षीही सभासद संस्थांना  20% डिव्हिडंड देण्यात आला. गेली अठरा वर्षे इफको मार्फत सभासदांना 20% डिव्हिडंड देण्यात येत आहे. तसेच सलग 19 वर्ष 20% डिव्हिडंड देणारी इफको ही संस्था आहे.

इफको ही देशातीलच नव्हे तर जगातील सहकार क्षेत्रातील खत उत्पादन व विपणन करणारी सर्वात मोठी संस्था आहे. नुकतीच इफकोची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 26 ऑगस्ट रोजी ऑनलाइन कॉन्फरन्स पद्धतीने घेण्यात आली. त्यामध्ये सर्व सभासद संस्थांना 20% डिव्हिडंड देण्याचे जाहीर करण्यात आले. सर्व सभासद संस्थांच्या अकाउंट मध्ये ऑनलाईन पेमेंट करून डिजिटल स्वरूपात डिव्हिडंड जमा करण्यात आल्याची माहिती गोकुळचे ज्येष्ठ संचालक व इफकोचे आमसभा सदस्य विश्वास पाटील यांनी दिली. 

भारतातील सहकार क्षेत्रातील इफको ही एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. इफकोच्या स्थापनेवेळी फक्त 57 सभासद संस्था होत्या. आता ती सभासद संस्थांची संख्या जवळजवळ 36 हजार इतकी झाली आहे. भारतातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी  इफकोचे योगदान आहे. तसेच सध्या भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये सहभागी होऊन इफको भरीव योगदान देत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT