election of gokul organizations kolhapur candidate in election possibility 
कोल्हापूर

‘गोकुळ’ संचालकांच्या भेटीगाठी; सत्तारूढबरोबरच विरोधकांच्या हालचालींना वेग

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात एकमेव गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून विद्यमान संचालकांसह सत्तारूढ गटातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्यांनी तालुकानिहाय ठरावदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. विरोधी गटांकडून यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

संघाने दाखल केलेली याचिका काल फेटाळल्यानंतर या निवडणुकीतील न्यायालयीन प्रक्रिया संपुष्टात आली आहे. त्यामुळे सत्तारूढबरोबरच विरोधकांच्या पातळीवरही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. संचालक रणजितसिंह पाटील, पी. डी. धुंदरे, धैर्यशील देसाई, विलास कांबळे यांनी एकत्रित कागलसह भुदरगड, राधानगरी तालुक्‍यातील ठरावदारांची आज भेट घेतली. चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्‍यात दिवंगत माजी अध्यक्ष राजकुमार हत्तरकी यांचे पुत्र सदानंद, संचालक विश्‍वास जाधव, अरुण नरके यांचे पुत्र चेतन आदींनी ठरावदारांच्या भेटी घेतल्या.

माजी आमदार अमल महाडिक व अनिल शहापुरे यांनी आज शिरोळ तालुक्‍यातील २६ व हातकणंगले तालुक्‍यातील काही गावांचा दौरा करून उत्पादकांबरोबरच प्राथमिक दूध संस्थांना भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. शाहूवाडी व पन्हाळा तालुक्‍यात संचालकांचे प्रतिनिधी मैदानात उतरले असून, त्यांनीही ठरावदारांच्या वैयक्तिक भेटीगाठीवर भर दिला आहे. विरोधी परिवर्तन आघाडीनेही तालुकानिहाय उत्पादक, ठरावदारांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. सद्यस्थितीत या निवडणुकीत दोन पॅनेल होणार, हे निश्‍चित आहे.  

जागा वाटपावरून धुसफूस शक्‍य

या निवडणुकीत पी. एन. व श्री. महाडिक यांचा पालकमंत्री पाटील यांना विरोध आहे, तर श्री. मुश्रीफ व पालकमंत्री पाटील हे श्री. महाडिक यांना सोबत घेण्यास तयार नाहीत. हा मुख्य अडसर ‘गोकुळ’ची निवडणूक बिनविरोध करण्यात येणार आहे. यातून जागा वाटपावरून या नेत्यांचेच एकमत होईल का नाही, याविषयी साशंकता आहे. 

शौमिका किंवा अमल रिंगणात

रिंगणात माजी आमदार अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. महाडिक यांच्या नावांवर शिरोली येथील दूध संस्थेचा ठराव आहे. सौ. महाडिक यांना महिला गटातून रिंगणात उतरल्यास त्यांच्या नावांवर ठराव असण्याची गरज नाही, अशी पोटनियमातील तरतूद आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Woman Worker Assault : भाजपच्या महिला कार्यकर्त्याला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा आरोप, पोलीस आयुक्तांनी सांगितलं नेमकं काय घडलं ?

Latest Marathi News Live Update : डफ–तुंतुण्याच्या गजरात निवडणूक प्रचार; बाप–लेक शाहिरी थाटात मैदानात

Google Search December 2025 : डिसेंबर 2025 मध्ये गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च झाले? धक्कादायक रिपोर्ट आले समोर

Phulambri News : शाळेसाठी जीव धोक्यात! एकदा पडले, तरी थर्माकोलवरून प्रवास सुरूच

Budget Foreign Trip: खिशाला परवडणारी फॉरेन ट्रिप! नेपाळसह ‘या’ 4 देशांत फिरा कमी बजेटमध्ये

SCROLL FOR NEXT