the election of kolhapur municipal corporation date possibility postponed in kolhapur 
कोल्हापूर

महापालिका निवडणूका आणखी लांबणीवर?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना रुग्णांची संख्या कितपत वाढेल, याचा अंदाज येत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका निवडणूक आता एक महिना पुढे जाण्याची शक्‍यता आहे. नवी मुंबईत कोराेनाने डोके वर काढल्याने मतदार यादीच्या कार्यक्रमाची प्रक्रिया निवडणूक आयोगाने थांबविली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर महापालिकेसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण होईल; मात्र प्रत्यक्ष निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

प्रारूप मतदार यादीवरील हरकती निकालात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. बारा मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. नंतर निवडणुकीची तारीख जाहीर होईल, असे सांगितले जात होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक लागेल, अशी चिन्हे होती. नवी मुंबईसह, कोल्हापूर तसेच अन्य काही महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य शासन सतर्क झाले आहे.

निवडणुका म्हटले की प्रचारफेऱ्या, राजकीय सभा, त्यामुळे होणारी गर्दी आणि त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास करायचे काय, असा प्रश्‍न आहे. तूर्तास शासनाने राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमांना काही दिवसांसाठी बंदी घातली आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली म्हटले, की भागाभागांत धांदल सुरू होते. त्यातून कोरोना वाढेल, या भीतीपोटीच तूर्तास निवडणुका न घेण्याच्या पवित्र्यात निवडणूक आयोग आहे. नवी मुंबईच्या मतदार यादीचा कार्यक्रम याच कारणामुळे थांबविण्यात आला. 

आजी-माजी नगरसेवक, नव्याने निवडणूक लढविणाऱ्यांनी सध्या जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांच्या स्तरावर नियोजन सुरू आहे. आरक्षण सोडत २१ डिसेंबरला झाल्यापासून प्रभागात धांदल उडाली आहे. महापालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० ला संपली आहे. प्रशासकांचा कालावधी १५ मेपर्यंत आहे. त्याअगोदर निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT